आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Thane (Maharashtra) Coronavirus Cases Unlock Phase 1 Update | Maharashtra Corona Cases Deaths District Wise Today News; Mumbai Pune Thane Nashik Aurangabad Bhandara

महाराष्ट्र कोरोना:रविवारी तब्बल 3 हजार 390 रुग्णांची नोंद, तर 120 मृत्यू, राज्यातील एकूण आकडा 1 लाख 7 हजारांच्या पुढे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच रविवारी राज्यात तब्बल 3 हजार 390 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली  आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1 लाख 7 हजार 958 वर गेला आहे. तसेच, 120 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 950 वर गेला असून सद्यस्थितीला राज्यात 53 हजार 017 रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान आज झालेल्या मृत्यूंमध्ये 81 पुरुष आणि 39 महिलांचा समावेश आहे.

मुंबईत फक्त 14 आयसीयू बेड शिल्लक

देशातील कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असलेल्या मुंबईमध्ये 99 टक्के आयसीयू बेड फुल झाले आहेत. तसेच, 94 टक्के वेंटिलेटर उपयोगात आणले आहेत. बृहनमुंबई महानगर पालिकेने ही माहिती दिली. 11 जूनपर्यंत मुंबई शहरात 1181 आयसीयू बेड होते,यातील 1167 बेड रुग्णांनी भरले आहेत. त्यामुळे आता नवीन रुग्णांसाठी फक्त 14 बेड शिल्लक आहेत. तर, व्हेंटिलेटर 530 मशीन्सपैकी 497 व्हेंटिलेटर वापरात आहेत. 

दरम्यान, सरकारने खासगी लॅबमधील कोरोना चाचची फी अर्ध्यापेक्षा कमी केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, आता खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी फक्त 2,200 रुपये द्यावे लागतील. पूर्ही ही फी 4,500 रुपये होती. 

0