आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड:एका महिलेसह तीन लोकांना अटक, दोन महिलांची टोळीतून मुक्तता; आरोपींमध्ये आटो चालकाचा समावेश

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • आटो चालक संबंधित महिलांना ग्राहकांच्या घरी किंवा हॉटेल्समध्ये घेऊन जात असे.

ठाणे पोलिसांनी मोठी कारवाईत शहरातील सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. दरम्यान, ठाणे पोलिसांनी संबंधित कारवाईमध्ये एका महिलेसह तीन लोकांना अटक केली होती. ज्यामध्ये दोन महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलून दिले होते. संबंधित आरोपी महिलांना या टोळीच्या तावडीतून मुक्त करण्यात आले असल्याचे बुधवारी ठाणे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुप्त माहितीच्या आधारे, मानव-तस्करीविरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला ग्राहक बनवून सोमवारी आरोपींकडे पाठविले. आरोपी महिलेने त्या ग्राहकाला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सासुपाडा गावातील एका हॉटेल बोलावले असल्याचे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी आरोपी महिलेचे दोन साथीदार दोन महिलांसह तेथे आले होते. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत एका महिलेसह तीन जणांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन महिलांना मुक्त केले.

आरोपींमध्ये ऑटो चालकाचा समावेश
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींमध्ये एका ऑटो चालकाचा समावेश असून आरोपींना आयपीसीच्या संबंधित कायदे आणि अनैतिक तस्करी (प्रतिबंध) कायद्यातर्गँत अटक करण्यात आली. आटो चालक संबंधित महिलांना ग्राहकांच्या घरी किंवा हॉटेल्समध्ये घेऊन जात असे.

बातम्या आणखी आहेत...