आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखे प्रकरण:26 वर्षांपूर्वी चोरी झाली होती सोन्याची साखळी, रेल्वे पोलिसांनी आता महिलेचा शोध घेऊन ती परत केली

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेनंतर महिलेने आपले घर बदलले होते, म्हणून पोलिसांना त्यांना शोधण्यासाठी बराच वेळ लागला

आजपासून सुमारे 26 वर्षांपूर्वी रेल्वेच्या प्रवासादरम्यान चोरीला गेलेली सोनसाखळी रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नानंतर महिलेला परत मिळाली. चोरीनंतर पोलिसांनी थोड्या वेळानंतरच हे प्रकरण निकाली काढले होते, परंतु चोरला पकडण्यापूर्वी त्या महिलेने आपले घर बदलले, म्हणून साखळी परत करण्यास उशीर झाला. त्यावेळी महिलेचा फोन नंबर देखील नव्हता. मात्र रेल्वे पोलिसांनी सतत तिला शोधण्याचा प्रयत्न चालू ठेवला आणि शनिवारी तिला शोधून काढळे. महिला देखील या प्रयत्नामुळे अत्यंत प्रभावित झाली आणि तिने रेल्वे पोलिसांचे आभार मानले.

अशाप्रकारे त्या महिलेची साखळी चोरी झाली होती

26 वर्षांनंतर ज्या स्त्रीला साखळी परत देण्यात आली आहे त्याचे नाव पिंकी डिकुना आहे. मुंबई मध्य रेल्वे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले की, महिलेने 8 फेब्रुवारी 1994 संध्याकाळी साडेसात वाजता चर्चगेट रेल्वे स्थानकावरून गाडी पकडली होती. यादरम्यान चोर तिच्या गळ्यातील 7 ग्राम वजनी साखळी हिसकावून फरार झाला होता. त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दिली होती.

पोलिसांनी त्याच वर्षी 15 एप्रिलला महमद निजाम नसीर या चोरोला पकडून साखळी जप्त केली होती. मात्र याची माहिती देण्यासाठी जेव्हा पोलिस महिलेच्या ठाणे येथील पत्त्यावर पोहचले तेव्हा ती तिथे राहत नसल्याचे समजले. रेल्वे पोलिसांनी तिच्याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नव्हते.

कोर्टाच्या आदेशानंतर महिलेचा शोध सुरू झाला

या दरम्यान कोर्टाने देखील महिलेला तिची साखळी परत करण्याचा आदेश दिला. यानंतर रेल्वे पोलिसांनी पुन्हा महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पिंकीच्या जुन्या घराजवळील सर्व शेजाऱ्यांकडे चौकशी केली. यानंतर काही नातेवाईकांची माहिती मिळाले. यानंतर पिंकी आता वसई भागात राहत असल्याचे पोलिसांना समजले. 26 वर्षांनंतर रेल्वे पोलिस अधिकारी मिलिंद पाटील यांनी शनिवारी चोरी झालेली साखळी परत केल्यानंतर महिलेला खूप आनंद झाला. कारण तिला साखळी परत मिळेल अशी अपेक्षा सोडली होती.