आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नाच्या विधी सुरू आहेत आणि नवरदेवाच्या मैत्रिणीने त्याला चल उठ, पळून जाऊ असा इशारा केला तर... असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये लग्नाच्या विधी सुरू असतानाच नवरदेवाची मैत्रिणी नवरीसमोरच त्याला चल पळून जाऊ असा इशारा करते. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खूप भावला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिसाद दिला. काही लोकांनी या व्हिडिओचा आनंद घेतला. तर काही लोक या व्हिडिओतील व्यक्तींना ट्रोल केले. मात्र आता या व्हिडिओचे सत्य समोर आले आहे.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 21 जून 2021 रोजी विजय मुणगेकर व मयुरी मुणगेकर यांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नामध्ये नवरदेव विजयची मैत्रिण अंकिता वालावकर ही देखील उपस्थित होती. तिने गंमतीत एक व्हिडिओ अजयसोबत बनवला आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यामध्ये ती नवरदेवाला 'अजूनही वेळ निघून गेलेली नाही, चल उठ पळून जा, कशाला लग्न करतोस' असा इशारा करताना दिसत होती.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता अनेकांना हसू आवरले नाही. काहींनी या व्हिडिओचा आनंद घेतला तर काहींनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र अंकिताने सडेतोड उत्तर देत या व्हिडिओला गंमतीत घ्या असे म्हटले आहे. तसेच हा व्हिडिओ बनवण्याचा प्लान त्यांनी आधीच केलेला होता असेही तिने स्पष्ट केले आहे. लग्नाच्या तीन दिवस आधीच त्यांनी या व्हिडिओचा प्लान केला होता. तसेच व्हिडिओ बनवताना त्यांनी अनेक रिटेक घेतल्याचेही तिने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.