आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या नावावर फसवणूक:मुंबईमध्ये लग्नाच्या नावावर टीव्ही अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप, पायलटच्या विरोधात केस दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भेटण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरी आला होता आरोपी

मुंबईमध्ये एका टीवव्ही अभिनेत्रीने लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका पायलटवरकेला आहे. ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल करण्यात आली आहे. महिलेने एक आठवड्यापूर्वी ही तक्रार दिली होती. ज्यावर पोलिसांनी तपास करत सोमवारी FIR दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

भेटण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरी आला होता आरोपी
या प्रकरणाचा तपास करत असलेले सब इंस्पेक्टर जावेद कराडकर यांनी सांगितले की, आरोपी आणि पीडितेची ओळख मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून झाली होती. दोघांची बोलणी लग्नापर्यंत पोहोचली होती. तक्रारीनुसार मुळतः भोपाळ निवासी आणि मुंबईत राहणारा पायलट नेहमी फोनवर महिलेसोबत बोलायचा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांमध्ये चॅटींग व्हायची.

पोलिसांनी सांगितले की, 10 दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला फोन केला आणि तिला भेटण्याची आणि घर पाहण्याची इच्छा व्यक्त केली. कराडकर यांनी तक्रारीच्या हवाला देत सांगितले की, अभिनेत्री मुंबईत एकटी राहत होती आणि आरोपी पायलटला घरी बोलावण्यावर ती सहमत झाली. घरी आल्यानंतर पायलटने कथितरित्या अभिनेत्रीवर अत्याचार केला.

लग्नासाठी तयार झाला नाही तेव्हा दाखल केली तक्रार
त्याने सांगितले की, आरोपीने पीडितेला आपल्या आई-वडिलांना भेटवणे आणि लग्न करण्याच्या विषयावर विश्वासात घेतले. मात्र आपले वचन कायम ठेवले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीच्या वागण्याला कंटाळून अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...