आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMC बजेट 2022:मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या होणार सादर, महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या- हे लोकांसाठीचे बजेट असेल जुमला बजेट नसेल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प उद्या म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे बजेट लोकांसाठी असेल, जुमला बजेट नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, आगामी निवडणूका पाहता त्यासाठी शिवसेना सज्ज आहे आणि आम्ही ही निवडणूक देखील जिंकू असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.

त्याचवेळी अर्थसंकल्पाबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि गरिबांना काय मिळाले? बजेट गोंधळात टाकणारे, 'जुमला', 'गोलमाल' आणि टाइमपास होते, तो एक फ्लॉप चित्रपट आहे.

BMC ही देशातील सर्वात श्रीमंत नगरपालिका आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये बीएमसीने एकूण 39 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. जे मागील वर्षीच्या तुलनेत 16 टक्के अधिक होते. बीएमसीचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक निधीचे बजेट होते. यापूर्वी 2021-20 या आर्थिक वर्षात बीएमसीने 33 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता.

बातम्या आणखी आहेत...