आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत लसीकरणाला आजपासून पुन्हा सुरुवात:​​​​​​​लसीकरणासाठी मुंबईत आगळावेगळा पॅटर्न; 24-26 मे थेट तर 27-29 मे दरम्यान ऑनलाईन नोंदणीव्दारे होणार लसीकरण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 टक्के पहिल्या तर 80 टक्के लसी ह्या दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

कोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण पूर्ववत सुरळीत होण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक आगळावेगळा पॅटर्न सुरू केला आहे. यानुसार 24 ते 26 मे म्हणजे सोमवार ते बुधवार असे 3 दिवस लसीकरण हे थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांसाठीच असणार आहे. लसीकरणाच्या या मोहिमेमध्ये 20 टक्के पहिल्या डोससाठी तर 80 टक्के लसी ह्या दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबईतील एकूण 239 केंद्रांवर कोविशील्ड लस देण्यात येणार आहे. यामध्ये 60+ वयाच्या नागरिकांना दोन्ही डोस (पहिला-20%, दुसरा-80%) आरोग्य व फ्रंटलाईन कर्मचारी आणि 45+ वयाच्या व्यक्तींना फक्त दुसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर कोव्हॅक्सिन लसीचा विचार करता सर्व वयोगटातील, दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी येवू शकतील.

याच आठवड्यातील 27 मे ते 29 मे पर्यंत असे तीन दिवस प्रत्येक केंद्रावर लसीकरण ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच मिळणार आहे. त्याच प्रमाणे केंद्र सरकारने दिलेल्या सुचनेनुसार, कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये किमान 12 ते 16 आठवड्याचे अंतर ठेवले जाणार आहे. म्हणजेच कोविशील्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांचे अंतर राखून दुसरी मात्रा दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...