आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:मुंबईत आज लसीकरण बंद, लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण; महानगरपालिकेने ट्वीट करत दिली माहिती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज रविवार असल्या कारणाने लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.

कोरोनाचा कहर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लसीकरण वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचवेळेस मुंबईतील लसीकरण केंद्रे आज बंद राहणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या ट्वीटद्वारे नागरिकांना ही माहिती दिली आहे. आज रविवार असल्या कारणाने लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.

याबद्दलची माहिती पालिकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.लसीकरणासंबंधी माहिती देताना महानगरपालिकेने ट्वीटमध्ये सांगितले की, रविवारी 23 मे रोजी मुंबईत कोणत्याच लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाणार नाही. सोमवारच्या लसीकरणाबतची माहिती महानगरपालिकेच्या ट्विटर हॅन्डलद्वारे आणि संबंधित वॉर्डाद्वारे नागरिकांना कळवण्यात येईल.

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकांच्या शंकेला उत्तर देताना, लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण बंद होत नसल्याची स्पष्ट माहिती नागरिकांना दिली आणि नागरी मंडळाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी रविवार असल्याने लसीकरण केंद्रे बंद राहतील हे कारण स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...