आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद:रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या मुलाला तेथील कर्मचाऱ्याने आपले जीव धोक्यात घालून वाचवले

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही संपूर्ण घटना काही क्षणाच्या आत घडली असून यावेळी मयुर आणि ट्रेनमध्ये थोडेफार अंतर होते

मुंबई ते बदलापूरदरम्यानच्या वांगणी स्टेशनवर आज थरारक असा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना 17 एप्रिल रोजी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली वांगणी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर एक वर घडली आहे. दरम्यान, यामध्ये एक लहान मुलगा आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवरुन जात असताना अचानकपणे त्याचा तोल रेल्वे ट्रॅकवर गेला. याच पटरीवरुन समोरुन एक लोकल ट्रेन धावत येत होती.

तेवढ्याच तेथील रेल्वे कर्मचारी मयुर शेळकेने आपला जीव धोक्यात घालून धावत जात त्याला मुलाला वाचवले. ही संपूर्ण घटना काही क्षणाच्या आत घडली असून यावेळी मयुर आणि ट्रेनमध्ये थोडेफार अंतर होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून मयुर शेळके यांचे सर्वच स्तरांतून कौतूक केले जात आहे.

मयुर शेळके रेल्वेत पॉईंटमेंट काम करतो
जीगरबाज मयुर शेळके हा रायगड जिल्हातील कर्जत तालुक्यातील तळवडे गावाचा रहिवाशी असून तो वांगणी रेल्वे स्टेशनवर पॉईंटमेंट म्हणून काम करतो. या घटनेत मयूर आपला जीव धोक्यात घालून त्या लहान मुलाला वाचवले आहे.

मला मृत्यूचे भय वाटले नाही - मयुर शेळके
मयुर बोलताना म्हणाला की, मला खूप आंनद होतोय की, आपल्यामुळे एका लहान मुलाचे जीव वाचले. "ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी तेथून काही अंतरांवर आपले काम करीत होतो. तेवढ्यातच मला एका महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मी लगेच आपले काम बाजूला सारत धावत-धावत रेल्वे पटरी जवळ केली. तेवढ्यातच समोरुन एक लोकल ट्रेन जोराने येत होती. परंतु, मला पूर्ण विश्वास होते की, आपण या मुलाला वाचवू शकतो."

बातम्या आणखी आहेत...