आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉस्पिटलमध्ये तोडफोड:नवी मुंबईच्या वाशी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा गोंधळ आणि तोडफोड, कॉम्प्यूटर्स आणि मेडिकल उपकरणांचे नुकसान

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या अनेक कॉम्प्यूटर्सची तोडफोड केली.

नवी मुंबईच्या वाशी सरकारी रुग्णायात एका रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयात जमा होऊन तोडफोड केली आहे. आरोपींना त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टर आणि नर्सवर हल्ला केला आहे. रुग्णालयाकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवर कारवाई करत वाशी पोलिसांना या हल्ल्याच्या प्रकरणी चार लोकांना अटक केली आहे.

बुधवारी पहाटे 3 वाजेदरम्यान झालेल्या या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये आरोपी हॉस्पिटलमध्ये तोडफोड करताना दिसत आहेत. ताज्या माहितीनुसार, जुहू येथे राहणाऱ्या एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबिय नाराज झाली आणि रुग्णालयात जमा होऊन गोंधळ घालत तोडफोड केली.

नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या अनेक कॉम्प्यूटर्सची तोडफोड केली. एवढेच नाही तर दोन डॉक्टरांसोबत बाचाबाची केली. पोलिसांना याविषयी सूचना मिळताच वाशी पोलिस स्टेशनमधून एक टीम हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि चार लोकांना तोडफोड करत असल्याचे पाहून घटनास्थळावरुन अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...