आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफवेमुळे गोंधळ:मुंबईच्या विक्रोळीत मोफत जमीन मिळण्याची पसरली अफवा, शेकडो लोकांनी रिकाम्या जमिनीवर ठोकले तंबू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफवा पसरताच लोकांची जमिनीकडे झुंबड, स्वतःसाठी 300-400 स्वेअरफूट जागेवर घेतला ताबा

मुंबईच्या विक्रोळी भागात सोमवारी मोफत जमीन वाटप सुरू असल्याची अफवा पसरली. यानंतर शेकडो लोक विक्रोळीच्या हद्दीतील रिकाम्या जमिनीवर पोहोचले आणि तेथे तंबू ठोकले. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासनाने या लोकांना अनेक वेळा समजावून सांगितले की कोणालाही जागा दिली जात नाही. मात्र तरीही मंगळवार सकाळपर्यंत लोक येथून जाण्यास तयार नाहीत.

वणव्यासारखी पसरली अफवा

विक्रोळी पोलिसांनुसार, सोमवारी अफवा पसरली की 100 एकर जागेच्या मालकाचा मृत्यू झाला आहे आणि त्यांची मुलगी गरिबांना जमीन वाटप करीत आहे. तसेच ज्यांनी जमिनीवर अतिक्रमण केले आहे त्यांना मोफत जमीन दिली जात आहे असेही म्हटले होते.

दरम्यान ही जमीन सरकारी असून कुणीतरी खोडसाळपणे अफवा परसवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. घटनेचा व्हिडीओ असूनही पोलिसांनी अद्याप पर्यंत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

300-400 वर्गफूटावर ताबा

विक्रोळी पोलिसांनी बीएमसी कर्मचाऱ्यांसोबत काही अतिक्रमण हटवले आहे. मात्र काही लोक अजूनही मोफत जमीन मिळण्याची आशा ठेवून येथून जाण्यास तयार नाहीत. स्थानिक शिवसेना आमदार सुनील राऊत म्हणाले की, आम्ही लोकांना सरकारी जमिनीवर अतिक्रमण करू देत नाहीत. अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान या लोकांनी स्वतःसाठी 300-400 वर्ग फूट जागेवर ताबा घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser