आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांसाठी थोडा दिलासा:मुंबईची हवा दिल्ली आणि अहमदाबादपेक्षा कमी विषारी, येथे वर्षभरात 45 गिगाग्राम होते पीएम 2.5 चे उत्सर्जन; आता भारतातही वायु प्रदूषणाचा अंदाज बांधणे शक्य

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 दिवसांच्या वायु प्रदुषणाचे पूर्वानुमान जारी करण्यात सक्षम झाला भारत

दिल्ली आणि अहमदाबादची हवा देशाची आर्थिक राजधानी मुंबईपेक्षा जास्त विषारी आहे. मुंबईमध्ये वर्षभरात विविध स्त्रोतांमधून 45 गीगाग्राम पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) 2.5 उत्सर्जित केले, तर दिल्लीने 77 गिगाग्राम आणि अहमदाबादने 57 गिगाग्राम पीएम 2.5 उत्सर्जित केले. याचा खुलासा विशेषज्ञ-समीक्षित(पियर-रिव्ह्यू) आंतरराष्ट्रीय जर्नल इल्सेवियर प्रकाशित झालेल्या एका संशोधनात झाला आहे. अर्थ अँड सायन्स मंत्रालयाअंतर्गत चालणाऱ्या सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) प्रकल्पाचे संस्थापक संचालक डॉ. गुफरान बेग यांनी सांगितले की, भारतात सध्याच्या घडीला कोणत्या ठिकाणी किती वायू प्रदुषण आहे. याची माहिती देण्याचे सिस्टम होते. परंतु एक-दोन किंवा तीन दिवसांनंतरचे पूर्वानुमान सांगण्याचा कोणताही अधिकृत फ्रेमवर्क देशात उपलब्ध नव्हता.

भारतातील वायू प्रदूषणाच्या धोक्याचा अंदाज या यावरुन लावला जाऊ शकतो की शिकागो विद्यापीठाच्या ऊर्जा धोरण संस्थेत एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स (AQLI) -2019 चा अहवाल प्रकाशित झाला होता. ज्यामध्ये वायु प्रदुषणामुळे 40 टक्के भारतीय नागरिकांचे वय 9 वर्षांनी कमी होण्याचा धोका वर्तवण्यात आला होता.

3 दिवसांच्या वायु प्रदुषणाचे पूर्वानुमान जारी करण्यात सक्षम झाला भारत
डॉ. बेग यांनी स्पष्ट केले की या कारणास्तव, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि पुणे या चार महानगरांमध्ये वायू प्रदूषणाच्या पातळीवर माहिती गोळा करण्यासाठी SAFAR ने एक मॉडेल तयार केले. आता या मॉडेलचा संशोधन अहवाल प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल एल्सेवियरमध्ये प्रकाशित झाला आहे. आता भारत जास्तीत जास्त तीन दिवसांपर्यंतचा वायू प्रदूषणाचा अंदाज जारी करण्यात सक्षम झाला आहे. लक्षणीय म्हणजे हवेत PM 2.5 असणे घातक आहे कारण यामुळे फुफ्फुसाशी संबंधित रोग होतात.

कोणत्या शहरात कशाचे उत्सर्जन जास्त झाले
SAFAR च्या संशोधन अहवालानुसार, दिल्लीमध्ये वाहतुकीमुळे सर्वाधिक 41 टक्के PM 2.5 उत्सर्जन होते. तर मुंबईत या स्त्रोतापेक्षा 31 टक्के, अहमदाबादमध्ये 35 टक्के आणि पुण्यात 40 टक्के उत्सर्जित पीएमचे उत्सर्जन होते. मुंबईतील झोपडपट्टी भागात कचरा आणि इतर गोष्टी उघड्यावर जाळल्यामुळे, बायो फ्यूल प्रदूषणमध्ये पीएम 2.5 चे प्रमाण अधिक आहे.

मुंबईच्या 15 टक्के बायो फ्लूय प्रदूषण, दिल्लीच्या 3 टक्के, अहमदाबादच्या 10 टक्के आणि पुण्याच्या 11 टक्केमध्ये पीएम 2.5 चे प्रमाण आढळले आहे. पुण्यात सर्वाधिक 22 टक्के औद्योगित प्रदूषणात पीएम 2.5 आढळला आहे. अशा प्रकारे दिल्लीमध्ये 19 टक्के, अहमदाबादमध्ये 19 टक्के आणि मुंबईत 15 टक्के औद्योगिक प्रदूषण होते.

बातम्या आणखी आहेत...