आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेर्‍यात कैद झाला मृत्यू:मुंबईत सेल्फीवरून पती-पत्नीमध्ये वाद, पत्नीने रेल्वेसमोर उडी मारुन केली आत्महत्या

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलीच्या वडिलांनी तिच्या पतीवर केले गंभीर आरोप

मध्य रेल्वे मार्गावरील विक्रोळी रेल्वे स्थानकावर एका 27 वर्षीय महिलेने ट्रेनच्या पुढे उडी मारुन स्वत:चे जीवन संपवले. ही घटना शुक्रवारी सकाळची आहे, परंतु याचे CCTV फुटेज आज समोर आले आहे. ही घटना विक्रोळी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर घडली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. फोनवर सेल्फी घेण्याच्या वादानंतर महिला पतीसोबत भांडण करून स्टेशनवर आली होती.

कुर्ला रेल्वे पोलिसांनी संबंधित घटनेत अपघाती मृत्यूचा रिपोर्ट दाखल केला आहे. हा व्हिडिओ 7 मे रोजीचा असून सकाळी 10.35 मिनिटांचा आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला प्रथम प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील एका बाकावर एकटी बसलेली दिसते. त्यानंतर समोरुन ट्रेन येत असल्याचे कळताच रेल्वेसमोर उडी मारते. त्यानंतर संपूर्ण ट्रेन तिच्या अंगावरुन जाते.

मुलीच्या वडिलांनी तिच्या पतीवर केले गंभीर आरोप
कुर्ला जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची ओळख संजना शेरे (वय 27) अशी झाली आहे. या घटनेनंतर महिलेचा मृतदेह दोन भागात आढळून आला. संजनाच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, संजनाच्या पतीने तिला शुक्रवारी सकाळी मारहाण केली. तिची सासू कित्येक महिन्यांपासून तिला सतत त्रास देत होती. मुलीने स्टेशनवर जाण्यापूर्वी मला फोन केला असल्याचे वडिलांनी म्हटले आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु असून संजनाच्या पतीला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...