आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजची पॉझिटिव्ह बातमी:वयाच्या 79 व्या वर्षी सुरू केला चहा मसाल्याचा बिझनेस, रोज मिळत आहेत 800 ऑर्डर, व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन केली होती सुरुवात

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईच्या सांताक्रूज वेस्टमध्ये राहणाऱ्या 79 वर्षीय कोकिला पारेख गुजराती कुटुंबातून आहेत
  • कोकिला अनेक वर्षांपासून चहाचा मसाला घरात तयार करतात, लॉकडाउनमध्ये मुलगा-सुनेने बिझनेस प्लान केला

कोकिला पारेख 79 वर्षांच्या आहेत. त्या मुंबईच्या सांताक्रूझ वेस्टमध्ये राहतात. अनेक वर्षांपासून त्या घरी आलेल्या पाहुण्यांना आपली स्पेशल मसाला चहा प्यायला देतात. जो कुणी चहा प्यायचा, तो विचारयाच की, यामध्ये नेमके काय टाकले आहे. लॉकडाऊनमध्ये मुलगा, सून घरीच होते, तेव्हा त्यांनी आईच्या हाताची टेस्ट संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचा प्लान केला.

अशाप्रकारे घरीच मसाला विकण्याचा बिझनेस सुरू झाला. महिनाभरातच दिवसभरात 700-800 ऑर्डर मिळू लागले. वाचा कोकिला पारेख यांच्या यशाची कहानी...

नातेवाईक, मित्रांना फ्रीमध्ये द्यायच्या
कोकिला सांगतात की, मी अहमदाबादची राहणारी आहे, लग्नानंतर मुंबईत आले. गुजराती कुटुंबात चहामध्ये मसाला टाकला जातो. आमच्या घरी तर पीढ्यांपासून चहा मसाला बनवला जातो. मुंबईमध्ये आल्यानंतरही मी चहा मसाला बनवायचे. आम्ही अनेक नातेवाईक, फॅमिली फ्रेंड्सला असाच चहा मसाला द्यायचो. काही लोक विशेषतः चहा मसाला घेण्यासाठीच यायचे.

त्या म्हणतात - लॉकडाऊनमध्ये मुलगा तुषारचे काम घरुनच सुरू होते. एक दिवस बोलता बोलता चहा मसाल्याला कमर्शियल करायचा विषय निघाला. मुलगा आणि सून प्रीतीने पॅकेजिंग, डिजाइनिंग आणि वेंडरपर्यंत मसाला पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. मला फक्त चांगला मसाला तयार करायचा होता. आम्ही विचार केला की, प्रयत्न करुन पाहायला काय हरकत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केले
आम्ही सप्टेंबरमध्ये हा सर्व प्लान केला आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जास्त क्वांटिटीमध्ये मसाला तयार केला. मुलगा आणि सूनेने व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मसाल्याविषयी पोस्ट केले. जे लोक पहिल्यापासूनच घेऊन जात होते त्यांनाही सांगितले की, कमर्शियल प्रोडक्शन सुरू केले आहे, तुम्ही ऑर्ड करु शकता.

पोस्ट करताच आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत रोज 250 ऑर्डरपर्यंत पोहोचलो होतो. कुठेही प्रमोशन केले नव्हते आणि जाहिरातही दिली नव्हती. फक्त व्हॉट्सअॅप ग्रुप आणि फॅमिली फ्रेंड्सपर्यंत मॅसेज फॉरवर्ड केला होता.

त्या म्हणतात की, 'माउथ पब्लिसिटीने मुंबईसह गुडगाव, दिल्ली, अहमदाबादमधूनही ऑर्डर मिळत आहेत. ऑर्डर वाढल्यानंतर हेल्पर ठेवला, पण मसाल्यांची मिक्सिंग अजुनही मीच करते. प्रोडक्शनचे पूर्ण काम सूनेने आपल्या हाता घेतले आहे आणि ऑर्डरसंबंधीत काम मुलगा पाहतो. आता दिवसातून 700 ते 800 ऑर्डर मिळत आहेत. आम्ही कुरियरच्या माध्यमातून थेट घरापर्यंत मसाला पोहोचवत आहोत. या मसल्याने टेस्ट वाढतेच, यासोबतच इम्यूनिटी आणि डायजेशनही इम्प्रूव्ह होते.'

पॅकेजिंग आणि लोकांवर काम केले
सून प्रीती सांगतात की, मसाला कमर्शियल लॉन्च करायचा आहे हे आईला जेव्हा सांगितले तेव्हा त्या खूप खूश झाल्या. त्यांचा मसाला देशभरात जाणार यामुळे त्या खूप आनंदी होत्या. कमर्शियल लॉन्चिंगपूर्वी आम्ही पॅकेजिंग आणि लोकांवर खूप काम केले. पॅकिंगसाठी एक एअरटाइट पॉकेट निवडले. यामुळे मसाला खराब होणार नाही आणि सुगंध जाणार नाही.

त्यांनी सांगितले की, सुरुवातीला रेग्यूलर मिक्सर ग्राइंडरचाच वापर करत होतो. प्रोडक्शन वाढल्यावर कमर्शियल मिक्सिंग यूनिट खरेदी केले. आम्ही केटी चाय मसाला या नावाने आमची कंपनी रजिस्टर्ड केली. अजून घरुनच काम सुरू आहे, पण लवकरच छोटा कमर्शियल यूनिट सुरू करु, जेथून पूर्ण काम चालेल. डिस्ट्रीब्यूटरशिपच्या माध्यमातून काम करत आहोत. कोणत्याही पब्लिसिटीविना श्रीनगरपासून तर अंडमानपर्यंत ऑर्डर येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...