आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील घटना:अचानक घरातून गायब झाली महिला, तपास सुरु केल्यावर खोलीतील सोफ्यामध्ये मिळाला मृतदेह

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील डोंबिवली पूर्व येथील मानपाडा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 33 वर्षीय महिलेची आधी गळा आवळून हत्या करण्यात आली, त्यानंतर तिचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडमध्ये लपवून ठेवण्यात आला. बराच तपास केल्यानंतर अखेर पोलिसांनी सोफ्याच्या आतून महिलेचा मृतदेह बाहेर काढला आहे. सध्या पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.

मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले की, डोंबिवली पूर्व दावडी येथील शक्तीनगर परिसरात राहणाऱ्या 33 वर्षीय सुप्रिया शिंदे यांचा मंगळवारी दुपारी 12.30 ते 9 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी गळा आवळून खून केला. घटनेच्या वेळी महिला घरात एकटीच होती आणि तिचा नवरा कामावर गेला होता.

पोलिस निरीक्षक बागडे यांनी सांगितले की, महिलेने तिच्या शेजाऱ्याला तिच्या मुलाला बरे वाटत नसल्याचे सांगून शाळेत सोडण्याची विनंती केली होती आणि संध्याकाळी ही महिला आपल्या मुलाला शाळेतून परत घेण्यासाठी गेली नाही तेव्हा शिक्षिकेने शेजाऱ्याला फोन केला. यानंतर शेजारी सुप्रियाच्या घरी पोहोचले. घराचा दरवाजा उघडा होता, पण घरात कोणी दिसत नव्हते. शेजाऱ्याने महिलेचा पती शेखर याला फोनवर माहिती दिली.

अशा प्रकारे सोफ्यामधून सापडला मृतदेह
घाईत नवरा आधी मुलाला आणायला शाळेत गेला आणि मग घरी येऊन बायकोला शोधू लागला. बरीच शोधाशोध करूनही पत्नी न सापडल्याने त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन बेपत्ता झाल्याची नोंद केली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सुप्रियाचा शोध सुरू झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतर सुर्पिया पोलिसांना ड्रॉईंग फॉर्ममध्ये ठेवलेल्या सोफा कम बेडमध्ये सापडली. मानेवरील खुणा पाहून आधी महिलेचा खून करून नंतर मृतदेह येथे लपवण्यात आल्याचे पोलिसांना लक्षात आले.

महिलेच्या फोन कॉल डिटेल्समधून महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत
सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिस या प्रकरणाचा खुनाच्या अँगलने तपास करत आहेत. पोलिस निरीक्षक बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. जवळपास बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक बागडे म्हणाले की, आम्ही कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही आणि शक्यतो सर्व बाजूंनी तपास करत आहोत. महिलेच्या फोन कॉल डिटेल्समधून आम्हाला महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. लवकरच आरोपी आमच्या ताब्यात असेल. सध्या याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...