आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना:...म्हणजे 40% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? यात तुम्ही काय करुन दाखवले? आशिष शेलारांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. यामध्ये मुंबई आघाडीवर आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे दिवसेंदिवस मुंबईकरांची चिंता वाढली होती. दरम्यान बुधवारी मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली. मुंबईत करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणात हर्ड इम्युनिटी वाढत असल्याचे दिसून आले. यानंतर भाजपने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आशिष शेलारांनी ट्विट करत यावर प्रतिप्रश्न केले आहेत.

नीती आयोग आणि मुंबई पालिकेच्या 3 वाँर्डातील अँटीबॉडी सर्वेक्षणात झोपडपट्टीत 57% तर इमारतीमध्ये 16% जणांना कोरोना होऊन गेल्याचे उघड. तर खाजगी लँबच्या सर्वेत सुमारे 25% लोकांना कोरोना होऊन गेलाय? म्हणजे 40% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? यात तुम्ही काय करुन दाखवले? असा सवाल आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला केला याहे.

पुढे शेलार म्हणाले की, झोपडपट्टीतील शौचालयांमध्ये असलेला स्वच्छतेचा अभाव आणि इमारतीमधील जंतूनाशक फवारणी बंद केल्याने कोरोना वाढला..चाचण्यांची संख्या जेव्हा आवश्यक होती तेव्हा वाढवली नाही. आता चाचण्या वाढवून कोरोना होऊन गेला सांगताय ? यात तुम्ही काय करुन दाखवले? 1 लाख अँटीबॉडी चाचण्या करा. सत्य समोर येईल. असा सल्लाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत लॉकडाऊनमध्ये नियम जास्त शिथिल करण्यात आलेले नाहीत. यानंतर नीती आयोग, मुंबई महानगरपालिका, टीआयएफआर यांच्‍याकडून मुंबईत सेरो सर्वेक्षण करण्यात आलं. याच्या पह‍िल्‍या फेरीचा अहवाल आला असून, त्यात मुंबईच्या झोपडपट्टयांमधील सरासरी सुमारे 57 टक्के नागरिकांमध्ये कोरोनाच्या ऍन्‍टीबॉडीज आढळून आल्या आहेत. तर बिगर झोपडपट्टी म्हणजे इतर रहिवासी भागांमधील रहिवाशांमध्ये सुमारे 16 टक्के ऍन्‍टीबॉडीज दिसून आल्याचे समोर आले. यानंतर आशिष शेलारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.