आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची महासभा:शिवसेनेकडे बोटं दाखवू नका, शायिस्तेखानासारखी छाटू! तेवढी आमच्यात ताकद- राऊतांचा विरोधकांना इशारा

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''मुंबईचा बाप फक्त शिवसेना असून आमचे बाप शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. ही सभा शिवसेनेच्या आधीच्या शंभर सभांची बरोबरी करणारी असून शिवसेनेकडे बोट दाखवू नका, शायिस्तेखानासारखी छाटू असा इशाराच शिवसेना नेते संजय राऊतांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.

शिवसेनेची मुंबईतील बिकेसी मैदानावर सभा सुरु आहे. या सभेत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत बोलत असून त्यांनी करारी भाषेत आपले भाषण सुरु केले.

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचे हिंदुत्व छत्रपती संभाजी राजांसारखे आहे. प्राण जाये पर वचन निभाये रक्त सांडू पण वचन सोडणार नाही असे आमचे नैतृत्व आहे. ओवैसी 2014 पासून महाराष्ट्रात येत आहेत. आतापर्यंत किमान वीस वेळा ते औरंगजेबाच्या कबरीकडे गेले होते त्यावेळी भाजप झोपली होती काय असा सवालही त्यांनी केला.

औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये

औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आला आहे. हिंदुत्व संकटात आहे. आज काश्मिरमधील हिंदु सर्वात जास्त धोक्यात आहे. गेल्या तीन महिण्यात 27 काश्मिरी पंडीतांची हत्या झाल्या पण या गोष्टी पुढे येत नाहीत असेही ते म्हणाले. आदित्य ठाकरे पंधरा जूनला अयोध्येत जाणार आहे असेही राऊत म्हणाले.

भाजवर कडाडून टीका

शिवसेनेकडे बोटं दाखवू नका, शायिस्तेखानासारखी छाटू आमच्या नादी लागू नका असेही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राचेच नव्हे तर उद्धव ठाकरेंना भविष्यात देशाचे नैतृत्व करायचे आहे. महाराष्ट्राचा हा सह्याद्रीसारखा आहे आणि शिवसेनाही सह्याद्रीसारखीच असल्याचेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...