आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:मुंबईचा नंबर वन गुजरातला धक्का, मुंबई इंडियन्स 5 धावांनी विजयी; यंदा दुसरा सामना जिंकला

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी पराभवाची मालिका खंडित करत यंदाच्या आयपीएलमध्ये आपला दुसरा विजय साजरा केला. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने लीगमधील आपल्या १० व्या सामन्यामध्ये हार्दिकच्या गुजरात टायटन्सला धूळ चारली. गुणतालिकेत दहाव्या स्थानी असलेल्या मुंबई संघाने ५ धावांनी सामना जिंकला. यासह गुणतालिकेत नंबर वन असलेल्या गुजरात संघाला यंदा तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात संघाच्या सलामीवीर वृद्धिमान साहा (५५) आणि शुभमान गिल (५२) यांनी केलेली शतकी भागीदारीची खेळी व्यर्थ ठरली.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात गुजरात टीमसमोर विजयासाठी १७८ धावांचे टार्गेट ठेवले होते. प्रत्युत्तरामध्ये गुजरात संघाला ५ गडी गमावत १७२ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून गोलंदाजीमध्ये एम. अश्विनने दाेन आणि गोलार्डने एक बळी घेतला. त्यामुळे गुजरातचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला.

हिटमॅन रोहितचे षटकारांचे द्विशतक; गोलार्डनंतर मुंबईचा दुसरा फलंदाज हिटमॅन कर्णधार रोहित शर्माने पुनरागमन करताना यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाेत्तम स्कोअरची नोंद केली. त्याने शुक्रवारी नंबर वन गुजरातविरुद्ध सामन्यात २८ चेंडूंत दाेन षटकार व पाच चाैकारांसह ४३ धावा काढल्या. यादरम्यान त्याने आयपीएलमध्ये पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाकडून षटकारांचे द्विशतक साजरे केले. आयपीएलमध्ये २०० षटकार पुर्ण करणारा रोहित हा गोलार्डनंतर (२५७) मुंबईचा दुसरा फलंदाज ठरला. यादरम्यान त्याने आपला सहकारी इशान किशनसाेबत झंझावाती खेळी करताना संघाला ७४ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. इशानने ४५ धावांची खेळी केली.

धावफलक, नाणेफेक गुजरात (गोलंदाजी) मुंबई इंडियन्स धावा चेंडू ४ ६ इशान किशन झे.राशिद गो. जाेसेफ ४५ २९ ०५ १ रोहित शर्मा पायचीत गो. राशिद ४३ २८ ०५ २ सूर्यकुमार झे.राशिद गो. संगवान १३ ११ ०० १ तिलक वर्मा धावबाद (हार्दिक) २१ १६ ०२ ० केरोन गोलार्ड त्रि.गो. राशिद ०४ १४ ०० ० टीम डेव्हिड नाबाद ४४ २१ ०२ ४ डॅनियल झे.राशिद गो. फर्ग्युसन ०० ०२ ०० ० एम. अश्विन नाबाद नाबाद ०० ०० ०० ० अवांतर : ०७, एकूण : २० षटकांत ६ बाद १७७ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-७४, २-९९, ३-१११, ४-११९, ५-१५७, ६-१६४ गोलंदाजी : मो. शमी ४-०-४२-०, अल्झारी जाेसेफ ४-०-४१-१, राशिद खान ४-०-२४-२, लुकी फर्ग्युसन ४-०-३४-१, प्रदीप संगवान ३-०-२३-१, राहुल तेवाटिया १-०-११-०. गुजरात टायटन्स धावा चेंडू ४ ६ वृद्धिमान झे.डॅनियल गो.अश्विन ५५ ४० ०६ २ शुभमान झे. गोलार्ड गो. अश्विन ५२ ३६ ०६ २ हार्दिक धावबाद (इशान) २४ १४ ०४ ० सुदर्शन हिट विकेट गो. गोलार्ड १४ ११ ०१ १ डेव्हिड मिलर नाबाद १९ १४ ०१ १ राहुल तेवाटिया धावबाद ०३ ०४ ०० ० राशिद खान नाबाद ०१ ०१ ०० ० अवांतर : ०४, एकूण : २० षटकांत ५ बाद १७२ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१०६, २-१११, ३-१३८, ४-१५६, ५-१७१. गोलंदाजी : डॅनियल सॅम्स ३-०-१८-०, जसप्रीत बुमराह ४-०-४८-०, एम. अश्विन ४-०-२९-०, रिले मेडरिथ ४-०-३२-०, कुमार कार्तिकेय ३-०-२९-०, केरोन गोलार्ड २-०-१३-१.

सामनावीर : टीम डेव्हिड सामनावीर डेव्हिडच्या २०९.५२ च्या स्ट्राइक रेटने २१ चेंडूंत २ चाैकार व ६ षटकारांसह नाबाद ४४ धावा

बातम्या आणखी आहेत...