आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम...:मुंबईच्या ‘सेफ स्पेस’ने दोन वर्षांत रोखल्या 600 वर आत्महत्या

मुंबई / विनोद यादव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नयना सभरवाल - Divya Marathi
नयना सभरवाल

राकेशची (बदललेले नाव) नोकरी अचानक गेली. त्यामुळे तो अत्यंत निराश झाला. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. पण मानसोपचार तज्ज्ञांच्या योग्य वेळी मिळालेल्या सल्ल्याने आता त्याचे आयुष्य सुरळीत झाले आहे. अशाच प्रकारे संगीताच्या (बदललेले नाव) कुटुंबातील सदस्यांना नशेचे व्यसन जडल्याने तिला कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला. त्यामुळे तिच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ लागला. पण मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या मदतीने तिला नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत मिळाली. अशाच लोकांना मदत करणाऱ्या मुंबईच्या नयना सभरवाल यांनी सांगितले की, ‘गेल्या दोन वर्षांत आम्ही ‘सेफ स्पेस’ उपक्रमांतर्गत ६०० पेक्षा जास्त लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. त्यासाठी डॉक्टर, मनोविकार तज्ज्ञ, कुटुंब आणि शाळांना प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली.’ सहा जणांच्या या टीमचे नेतृत्व करणाऱ्या नयना सांगतात,‘ गेल्या काही महिन्यांत तरुणांत आत्महत्येच्या प्रकरणांत वेगान वाढ झाली आहे. विशेषत: कोरोनामुळे मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन आम्ही क्रायसिस इंटरव्हेन्शन प्रोग्राम सुरू केला. त्याअंतर्गत कॉल करून किंवा कोणाच्या माध्यमातून संपर्क करून आमच्या टीमने त्यांच्या मानसिक स्थितीचे अचूक आकलन केेले आणि योग्य वेळी त्यांना आत्महत्येच्या जोखमीतून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन केले.

आत्महत्या करणाऱ्यांत १० टक्क्यांपर्यंत वाढ : बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश डिसुझा यांनी एनसीआरबीच्या अहवालाच्या आधारे सांगितले की, २०१८ मध्ये देशात १.३५ लाख लोकांनी आत्महत्या केली होती. २०१९ मध्ये ही संख्या १.३९ लाख तर २०२० मध्ये ती १.५३ लाख झाली. म्हणजे १०% वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात मदतीसाठी दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी आमच्या फाउंडेशनशी संपर्क केला होता.

बातम्या आणखी आहेत...