आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai's Terrorist Sameer Sheikh Is A Driver By Profession, Suddenly Disappeared From The House Two Days Ago, Wife And Two Daughters Are Being Interrogated

दहशतवादाचे मुंबई कनेक्शन:मुंबईतला ड्रायव्हर समीर निघाला दहशतवादी! नातेवाइकांसह शेजारी सुद्धा हैराण, स्फोटांसाठी जमवत होता सामुग्री; दिल्लीला जात असताना रेल्वेत पकडले

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • समीरला शस्त्रे पुरवण्याचे काम सोपवण्यात आले होते

एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भाग राहिलेल्या पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधीत 6 दहशतवाद्यांना मंगळवारी (14 सप्टेंबर) ला अटक करण्यात आली. याच्या काही तासांनंतरच मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. समीर कालिया 12 सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होता आणि 14 तारखेला त्याच्या अटकेची बाब समोर आली आहे. दिल्ली गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, मुंबईहून दिल्लीला जात असताना शेखला कोटा येथून एका ट्रेनमध्ये अटक करण्यात आली आहे.

अजुनही समीरची पत्नी आणि मुलींची मुंबईतील धारावी पोलिस ठाण्यात चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र एटीएस टीमला हे जाणून घ्यायचे आहे की समीर मुंबई किंवा महाराष्ट्राच्या इतर काही भागात इतर काही लोकांच्या संपर्कात होता का? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरच्या पत्नीने पोलिसांना सांगितले आहे की तिला समीर दहशतवादी असल्याचा कधीच संशय आला नाही. ड्रायव्हर असलेला शेख दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेजारी आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे. ते म्हणतात की शेख हा 'फॅमिली मॅन' आहे आणि तो कधीच कोणाशीही मोठ्या आवाजात बोलत देखील नाही.

समीरचे कुटुंब मुंबई सेंट्रलच्या सायन परिसरातील एमजी रोडवरील कलाबाखर परिसरातील झोपडपट्टीत राहते. शेखच्या अटकेनंतर लगेचच मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक त्याच्या घरी पोहोचले आणि त्यांची अनेक तास चौकशी केली. समीरला दोन मुली आहेत. कुटुंबासह पोलिसांनी त्यांच्या शेजाऱ्यांचीही चौकशी केली आहे. समीर हा दहशतवादी आहे याबद्दल जवळजवळ प्रत्येकाने आश्चर्य व्यक्त केले आहे. येथून चौकशी केल्यानंतर रात्री मुंबईच्या इतर काही भागातही छापे टाकण्यात आले आहेत. मात्र तेथून काही जप्त करण्यात आले आहे की नाही हे मुंबई पोलिसांनी सांगितले नाही.

समीरला शस्त्रे पुरवण्याचे काम सोपवण्यात आले होते
दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमचा निकटवर्तीय, समीरला अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्हशी संबंधित पाक-आधारित व्यक्तींनी भारतातील विविध संस्थांना IED, शस्त्रे आणि ग्रेनेड पोहोचवण्याचे काम सोपवले होते. तपास एजेंसीच्या मते, अनीसने आगामी सणासुदीच्या काळात भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा दहशतवादी कट रचला होता. तपास संस्थेच्या मते, त्यांचा हेतू दिल्ली, यूपी, महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांमध्ये लक्ष्य हत्या आणि स्फोट घडवून आणणे हा होता.

या 6 जणांना अटक करण्यात आली
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी जान मोहम्मद शेख उर्फ ​​समीर कालिया, ओसामा उर्फ ​​सामी, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद आमिर जावेद, मूलचंद उर्फ ​​'साजू' उर्फ ​​लाला यांना राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अटक केली आहे. हे सर्व दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या शहरांना लक्ष्य करून मोठा स्फोट करण्याची योजना आखत होते.

पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन दहशतवादी दिल्लीत स्फोट करणार होते एकूण अटक केलेल्यांपैकी ओसामा उर्फ ​​सामी आणि जीशान कमर यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सांगितले की ते प्रथम विमानाने मस्कटला गेले आणि नंतर समुद्रमार्गे पाकिस्तानातील ग्वादर बंदरात गेले होते. त्यांना शस्त्रांचा वापर आणि स्फोटके बनवण्यासाठी पाकिस्तानमध्ये 15 दिवस प्रशिक्षण देण्यात आले, त्यानंतर तो त्याच मार्गाने भारतात परतले. भारतात परतल्यावर त्यांना IED लावण्यासाठी दिल्ली आणि यूपीमधील विविध ठिकाणांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...