आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी विशाल सूर्यकांत शिंदेचा ठावठिकाणा शोधत मुंबईच्या लोअर परेल येथे टॅक्सीमध्ये भटकत होतो. एका ठिकाणी, जेव्हा मी एका जणाला विचारले की ते जे मूर्ती बनवतात... एवढे म्हणताच, माझ्या टॅक्सीवाल्याने सांगितले की, अहो मॅडम, पहिले सांगायचे होते ना, तिथे मी दररोज काही ग्राहक सोडून येतो. माझ्या टॅक्सी चालकाने गाडी सुरू केली आणि विशाल सूर्यकांत शिंदे यांच्या त्रिमूर्ती स्टुडिओसमोर उभी केली.
मातीपासून गणपतीची विविध प्रकारची बाल रूपे बनवणाऱ्या विशाल शिंदे यांची ख्याती जगभरात प्रसिद्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे ती एक अशी व्यक्ती आहे ज्याने गणेश मूर्ती बनवण्यात क्रांती आणली आहे, विश्व त्यांच्या हातांच्या जादूमागे भुलले आहे.
विशाल शिंदेची बोटे फक्त मातीशी बोलतात. बुद्धी केवळ फक्त गणेशाची विविध रूपांविषयी विचार करते. डोळे फक्त रंगांनी खेळतात. भूक नाही किंवा तहान नाही. फक्त झोपणे, उठणे, कपडे घालणे, खाणे -पिणे हे सर्व गणेशमूर्तींमध्ये आहे. हेच कारण आहे की जेव्हा विशाल शिंदे गणेशाची मूर्ती साकारतात, तेव्हा असे वाटते की, गणेशजी आपल्याशी बोलायला सुरुवात करतील, कधीकधी वाटते, गणेश खेळता-खेळता धकले आहे, कधीकधी असे वाटते की जेवण झाल्यावर तो थोडा आळस आला आहे. गणेशाची इतकी रूपे कोणी विचार केली नाहीत किंवा पाहिली नाहीत.
विशाल सांगतात की माझे वडील सूर्यकांत शिंदे लहानपणापासूनच मूर्ती बनवायचे, कारण आम्ही लाल बागजवळच्या चाळीत राहायचो. वडील लाल बागेत जाऊन मास्टर कलाकारांना पाहायचे आणि मूर्ती बनवायचे. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी मूर्ती बनवायला सुरुवात केली. विशाल हे त्यांच्या वडिलांकडून शिकले, पण त्यांना ती कौटुंबिक परंपरा म्हणून पार पाडायची नव्हती, पण त्यांना ते नियम, कायदे आणि काहीतरी हटके करायचं होतं. त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचे शिक्षण घेतले.
विशाल हे मूर्ती बनवण्यासाठी शाडूमातीचा प्रयोग करतात. रंगांच्या निवडीमध्ये ते खूप हुशार म्हणून ओळखले जातात. पूर्वी ते त्यांच्या चाळीवरून काम करायचे. दहा वर्षांपूर्वी त्यांनी लोअर परेलमध्ये A to Z इंडस्ट्रियल स्टेट येथे स्टुडिओ उभारला. पुढील नियोजनाबाबत ते सांगतात की पुढील वर्षापासून रंगांची विक्रीही सुरू करेल.
मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे बाल रूप
विशाल शिंदे यांच्या आधीही शतकांपासून गणेश मूर्ती बनवल्या जातात, मग शिंदे यांचे वेगळेपण काय आहे. ते सांगता की बाल स्वरूप, गजमुख, रंगसंगती, स्किन टोन, अतिशय सफाईदार केलेल्या मूर्ती, कामासाठी प्रामाणिकपणा, कामावर बिनशर्त प्रेम, माझे जीवन गणेश, माती आणि रंग आहे. प्रत्येक क्षणी, विशाल गणेशाच्या भावाचा विचार करत असतता, असे भावज की, जे पाहिल त्याला वाटले की, गणेशाने त्यांच्या हृदयात प्रवेश केला आहे.
कोणतीही मार्केटिंग केली नाही
विशाल सांगतात की त्यांनी कधी त्याचे मार्केटिंग केले नाही. माउथ पब्लिसिटी होत गेली. या प्रसिद्धीचे एक कारण, ते म्हणतात की, कदाचित आम्ही व्यावसायिक आणि प्रसिद्धीसाठी देखील सुरुवात केली नाही, म्हणून आमच्या बाबतीत असे घडले. ही सर्जनशीलता आमच्या हृदयाच्या अगदी जवळ होती. आम्हाला त्याशिवाय दुसरे काही सुचतच नव्हते.
ते सांगतात की मी या मूर्ती फक्त पैसे कमवण्यासाठी, आणि बनवायच्या म्हणून बनवायच्या असे नाही. ते सांगतात की मला इतके परफेक्शन हवे आहे की सोंड किती ठेवावी, शाल किती ठेवावी, मुकुट केवढा असावा, कोणती गोष्ट किती इंचिची असावी, अजून कोणता रंग असावा. परफेक्शनमध्ये मला थोडीशी तडजोड स्वीकार्य नाही. एवढेच काय तर मी ग्राहकाचे देखील ऐकत नाही. अटॉनॉमी समान असणे आवश्यक आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता, अस्सल असणे आवश्यक आहे. भावना या कळाल्या पाहिजेत.
2000 ते 18,000 किंमत
विशाल शिंदे यांनी बनवलेल्या मूर्तींची किंमत 2000 ते 18,000 रुपयांपर्यंत आहे. ते माती आणि फायबर या दोन्हींपासून शिल्प बनवतात. फायबर शिल्पांची किंमत 2000 पासून सुरू होते. मातीच्या मूर्तींची किंमत 12000 ते 18000 पर्यंत आहे. फक्त पारंपारिक लुक बनवतात. एका मूर्तीसाठी तीन ते चार दिवस लागतात. ते हे काम फक्त तीन महिन्यांसाठी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने करतात. यासाठी अडवान्समध्ये ऑर्डर घेतली जाते. उर्वरित दिवस ते ऑर्डरवर इतर मूर्ती बनवतात. चौकाचौकातील शिल्पांप्रमाणे.
2023 पर्यंत बुकिंग फुल आहेत
आज कोणी खरेदी करायला आले तर मिळणार नाही. विशाल म्हणतात की मी फक्त ऑर्डरवर मूर्ती बनवतो. 2023 पर्यंत बुकिंग फूल आहे. आज जर कोणी माझ्याकडे मूर्तीसाठी आले तर मी ते देऊ शकत नाही कारण या सर्व दोन वर्षांपूर्वीच्या ऑर्डर आहेत. ते सांगतात की दोन-तीन वर्षांपूर्वी अंबानी कुटुंबातील कर्मचाऱ्यांमधून कुणी तरी मूर्ती घेण्यासाठी आले होते, ज्याला आम्ही नकार दिला होता. असे व्हीव्हीआयपी येतात की, किती नावे सांगावी, पण आम्ही आमच्या तत्त्वांशी तडजोड करत नाही.
मी एका सीजनमध्ये फक्त 270 ते 300 मूर्ती बनवतो, त्यापेक्षा जास्त नाही. खरेतर, ऑर्डर एवढ्या आहेत की, मी संपूर्ण वर्ष बनवल्या तरी काम संपणार नाही, परंतु माझी काम करण्याची माझी स्वतःची पद्धत आहे. ऑर्डर फक्त दसऱ्यापासून 31 डिसेंबर पर्यंत घेतली जाते.
तीन भाऊ आहेत, विशाल मूर्ती बनवतात, दोन भाऊ दुसरे काम पाहतात
विशाल शिंदे हे तीन भाऊ आहेत. यापैकी विशाल मूर्ती बनवतात, सुनील शिंदे कार्यालयीन कामकाज, वितरण, डिस्पॅच, ग्राहक, पाहुणे हे सर्व पाहतात आणि तिसरा भाऊ भूषण शिंदे बाहेरचे काम करतात, ज्यात वेळेवर साहित्य इत्यादींची व्यवस्था करणे यांचा समाविष्ट आहे. विशाल यांनी बनवलेल्या मूर्ती जगात अमेरिका, यूके, सिंगापूर, थायलंड, ऑस्ट्रेलिया येथे जातात, पण मातीच्या बनवलेल्या मूर्ती इथे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे फायबरपासून बनवलेल्या मूर्ती बनवल्या जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.