आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला प्रीमियर लीग:मुंबईची विजयी हॅट‌्ट्रिक; बंगळुरूवर टांगती तलवार, दिल्ली कॅपिटल्सच्या विजयी माेहिमेला ब्रेक​​​​​​​

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर साईका इशाकीने (३/१३) सरस गाेलंदाजीतून आपल्या मुंबई इंडियन्स संघाची गुरुवारी महिला प्रीमियर लीगमध्ये शानदार विजयी हॅॅट‌्ट्रिक साजरी केली. कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वात फाॅर्मात असलेल्या मुंबई संघाने सामन्यात मेग लॅनिंगच्या दिल्ली कॅपिटल्सच्या विजयी माेहिमेला ब्रेक लावला. मुंबई संंघाने १५ षटकांत ८ गड्यांनी दिल्लीवर मात केली. साईकाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव १८ षटकांत १०५ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात मुंबईने २ गड्यांच्या माेबदल्यामध्ये विजयश्री खेचून आणली.

गुजरातची बेथमुनी जायबंदी; स्नेह राणाकडे नेतृत्व : विजयी ट्रॅकवर आलेल्या गुजरात जायंट्स संघाला माेठा धक्का बसला. संघाची कर्णधार बेथमुनीला दुखापत झाली. त्यामुळे तिला बाहेर पडावे लागले. तिच्या जागी स्नेह राणाची गुजरात संघाच्या फुलटाइम कर्णधारपदी निवड झाली. ऑलराउंडर अॅश्ले गार्डनर ही संघाच्या उपकर्णधारपदी असणार आहे.

बंगळुरू संघासमाेर आज यूपी वाॅरियर्जचे तगडे आव्हान
स्मृतीच्या नेतृत्वात बंगळुरू संघ अडचणीत सापडला आहे. संघाला प्लेऑफमधील प्रवेशाच्या आशा कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. बंगळुरू संघाला शुक्रवारी यूपी वाॅरियर्जच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. यातील विजयासाठी बंगळुरूला कसरत करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...