आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्‍ट्राचार:रेशन धान्याची परस्पर विकी, दुकानदाराचा परवाना रद्द

रायगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय योजनांचे धान्य लाभार्थींना वितरीत न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खडपोली येथील रेशन दुकानदार रमेश जाधव यांचा परवाना रद्द करून अनामत रक्कम जप्तीसह साडेअठरा हजारांचा दंड ठोठावला आहे. यामुळे रेशन दुकान अनियमितताप्रकरणी ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले असले तरी राजकीय हस्तक्षेपामुळे अहवालात गंभीर मुद्दे वगळले गेले आहेत. याविरोधात ग्रामस्थ कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार आहेत.

खडपोली येथील रेशन दुकानदाराकडून लाभार्थींना धान्य वितरीत न करता त्याची परस्पर विक्री होत असल्याची तक्रार सुभाष जोशींसह ६० ग्रामस्थांकडून तहसीलदारांकडे करण्यात आली होती. यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना, प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनांमधील धान्याचा समावेश आहे. काही जागरूक नागरिकांनी ऑनलाइन प्रणालीच्या नोंदी तपासल्या असता शासनाकडून प्राप्त धान्य ग्रामस्थांना वितरीत केल्याच्या खोट्या नोंदी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार तहसीलदार तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होऊन लाभार्थींचे जबाब नोंदवण्यात आले. ग्रामस्थांना धान्य न देणे व पदावर नसलेल्या नाॅमिनींची खोटी साक्ष घेऊन धान्य वितरण होत असल्याचे भासवणे, रेशन कार्ड अवैधरीत्या जमा करून घेणे, केरोसीनचा वाटप न करणे आदी गंभीर प्रकारही ग्रामस्थांनी चौकशीत कथन केले.

बातम्या आणखी आहेत...