आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीतर्फे 17 डिसेंबरला होणार्या 'महाराष्ट्रद्रोही विरुद्ध हल्लाबोल' महामोर्चाच्या नियोजनासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात आज पार पडली. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या मोर्चात जवळ जवळ 20 हजार लोक सहभागी होतील असे नियोजन करण्यात आले.
ही बैठक कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.या बैठकीला राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, प्रदेश राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ, जिल्हा निरीक्षक विलास माने, दिनकर तावडे, प्रमोद ऊर्फ अप्पा पाटील, ताजुद्दीन इनामदार, उपाध्यक्ष बाप्पा सावंत, अल्पसंख्याक मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका निरीक्षक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
'मविआ'ची संयुक्त पत्रकार परिषद
राज्यपालांच्या शिवरायांवरील वक्तव्यानंतर 17 डिसेंबरला राज्यव्यापी मोर्चा काढला जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीची एक बैठक राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषदही घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींची उपस्थिती होती.
अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र द्रोहींविरोधात येत्या 17 तारखेला मोर्चा होणार आहे. महाराष्ट्राचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीमाभागातील गावावर घाला घालण्याचे काम केले जात आहे.
भाजपने उद्योग पळवले - पटोले
नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात मंगलकलश यशवंतराव चव्हाणांनी आणला. महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान भाजप ठरवून केला जात आहे. महाराष्ट्राचे उद्योग पळवले, मुंबई नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने महामोर्चा करण्याचे ठरवले आहे.
बोम्मईंची प्रक्षोभक भाषणे - अजित पवार
अजित पवार म्हणाले, मराठी भाषिकांवर कर्नाटकच्या कन्नड वेदिकेकडून अत्याचार होत आहेत. भाषावार प्रांतरचना असतानाही मराठी भाषिकांवर अन्याय आणि दडपशाही केली जात आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरण असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री प्रक्षोभक भाषणे करीत आहेत. महाराष्ट्राबद्दल अस्मिता बाळगणारेच फक्त यावर आवाज उठवत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.