आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटोलेंचे स्पष्टीकरण:माझा वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला - प्रदेशाध्यक्ष नाना पटोले; आधी पूर्ण माहिती घ्या मग आरोप करा - मलिक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीने काय प्रतिक्रिया दिली होती?

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काही वेळापूर्वी माझ्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला होता. याविधानावरुन राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. या वक्तव्यावर राष्ट्रवादीने ही प्रतिक्रिया दिली असून योग्य माहिती घेऊनच आरोप करावा असा टोलादेखील लगावला होता.

परंतु, आपल्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. माझे आरोप राज्य सरकार नसून केंद्र सरकारवर असल्याचे ते यावेळी म्हणाले. मी मुंबईत आल्यावर या विधानावर सविस्तर प्रतिक्रिया देईन असे पटोले यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले होते पटोले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. ते आज लोणावळ्यातील काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे असल्याने ते मला सुखाने जगू देणार नाही असा टोलाही पटोले त्यांनी यावेळी लगावला आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीने काय प्रतिक्रिया दिली होती?
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या पाळत ठेवण्याच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार केला आहे. नाना पटोले यांनी केलेले सर्व आरोप माहितीअभावी आहे. त्यांनी आधी व्यवस्थेची माहिती घ्यावी, आपल्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेऊनच आरोप करावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. पटोले यांच्या त्या आरोपावर मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...