आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मास्क स्वस्त होणार:राज्यात अवघ्या 19 ते 50 रुपयांत मिळणार एन-95 मास्क, मास्कच्या किंमतींचे नियमन करणारे महाराष्ट्र बनले पहिले राज्य

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासन मान्यतेनंतर सुधारित दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक
  • ट्रिपल लेअर मास्क 3 ते 4 रुपयांतच मिळणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिटायझरच्या किमतींवर नियंत्रणासाठी नेमलेल्या समितीने अहवाल राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत मास्क उपलब्ध होणार आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. एन-९५ मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारणत: १९ ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध होईल. दुहेरी व तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील. समितीने निर्धारित केलेल्या किमतींवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शासन मान्यतेनंतर सुधारित दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यापूर्वी दिव्य मराठीच्या पुढाकारानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चाचणीचे दर निश्चित केले होते. त्यात सुद्धा महाराष्ट्र पहिले राज्य ठरले होते.

बातम्या आणखी आहेत...