आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याला कोरोनाचा विळखा:या महिन्यात धारावीमध्ये 62 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण वाढले; शुक्रवारी देशात आढळलेल्या एकूण रुग्णांच्या 63% महाराष्ट्रात आले समोर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात शुक्रवारी 25,681 लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजेच धारावीमध्ये कोरोना संक्रमणाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मार्चमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 272 प्रकरणे समोर आली आहेत. तर फेब्रुवारीमध्ये एकूण 168 प्रकरणे समोर आली होती. या हिशोबाने संक्रमणाची प्रकरणे 62% नी वाढली आहेत. BMC च्या जी-नॉर्थचे सहाय्यक महामंडळ आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, धारावीत संसर्ग होण्याचे वाढते प्रकार प्रशासनासाठी चिंताजनक आहेत. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी परिस्थितीशी सामना करण्यास ते तयार आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता जी प्रकरणे समोर येत आहेत ती झोपडपट्टीतील वेगवेगळ्या भागातील आहेत, एका ठिकाणची नाहीत. धारावीमध्ये अजुनही 72 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत महामारीच्या विळख्यात सापडलेल्या 4,133 लोकांमधून 3,745 संक्रमणातून मुक्त झाले आहेत. तर 316 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही झोपडपट्टी 2.5 वर्ग किलोमीटरपेक्षाही जास्त क्षेत्रापर्यंत पसरली आहे.

एका दिवसात संक्रमणाचा दुसरा सर्वात मोठा आकडा
राज्यात शुक्रवारी 25,681 लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत. नवीन संक्रमितांचा हा आकडा गेल्या 28 नोव्हेंबर 2020 नंतर सर्वात जास्त आहे. त्या दिवशी 41,815 रुग्ण आढळले होते. ही संख्या देशात आढळलेल्या एकूण रुग्णांच्या 63% आहे. महाराष्ट्रात 2.85 लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात या प्रकरणांची संख्या वाढून 24 लाख 22 हजार 21 झाली आहे.

महाराष्ट्राच्या या शहरांमध्ये वाढवले निर्बंध

  • नाशिकमध्ये संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व दुकाने आणि प्रतिष्ठान बंद राहतील.
  • ठाण्यामध्ये 31 मार्चपर्यंत 16 हॉटस्पॉट्सवर लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
  • उस्मानाबादमध्ये रात्री 9 वाजेपासून सकाळी 5 पर्यंत नाइट कर्फ्यू जारी आहे. येथे आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे आणि रविवारी पूर्ण लॉकडाउन राहिल.
  • पुण्यात रात्री 11 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत निर्बंध राहतील. सध्याकाळच्या वेळी गार्डन आणि पार्क बंद राहतील. हॉटेल आणि रेस्तरॉ केवळ रात्री 10 पर्यंत सुरू राहतील.
  • नागपुरात 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येणार कडक निर्बंध.
बातम्या आणखी आहेत...