आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांपूर्वी आजोबा झाले आहेत. अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. आज या नव्या पाहुण्याचा नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम शिवतीर्थावर पार पडला आहे. राज ठाकरे आपल्या नातवाचे नाव काय ठेवणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. राज यांना नातू झाल्यापासून सोशल मिडियावर बाळाच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अखेर उत्स्कुता संपली असून राज ठाकरे यांच्या नातवाचे नाव 'किआन' असे ठेवण्यात आलं आहे. सचिन मोरे यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून राज ठाकरेंच्या नातवाचे नाव सांगितले आहे.
'किआन' हे हिंदू धर्मातील नाव आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God), प्राचीन (Ancient), राजेशाही (Royal) असा आहे. या सोहळ्यासाठी केवळ घरातीलच लोकांना आमंत्रित करण्यात आलं. 5 एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले होते. अमित ठाकरेंनी त्यांच्या बाळाचा फोटो फेसबुकवरुन शेअर केला होता.
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे 2019 साली लग्न झाले होते. लोअर पर सेंट रेजिस हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. त्यांच्या भव्य लग्नसोहळ्यात प्रतिष्ठित नेते, ज्येष्ठ राजकीय मंडळी आणि याशिवाय बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. लग्नानंतर अमित ठाकरे यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
कॉलेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात -
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे हे कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अमित ठाकरे पोदार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होते तर मिताली रुईया महाविद्यालयात कला शाखेत शिकत होत्या. तेव्हाच या दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या घरच्यांना आपल्या नात्याबद्दल सांगितले. कुटुंबियांनी होकार दिल्यानंतर दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. मिताली बोरुडे या फॅशन डिझायनर आहेत. मिताली यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतले आहे. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.