आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष:मुंबईत ट्रॅक्टर रॅली काढून काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन, नाना पटोलेंनी स्वीकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून औपचारिकरित्या पदभार आज स्वीकारला. मुंबईतील टिळक भवन येथे हा कार्यक्रम झाला. यानंतर काँग्रेसने मुंबईत शक्तीप्रदर्शन करत ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'नरेंद्र मोदींनी देशातील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली, तसेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केले आहे. या माध्यमातून आम्ही देशाच्या अन्नदात्याचा अपमान करेल त्याच्याविरोधात या पध्दतीची व्यवस्था निर्माण केली जाईल असा संदेश देत आहोत' असे नाना पटोले म्हणाले.

पुढे बोलताना पटोलो यांनी महागाईवरही बोट ठेवले. 'आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर कमी आहेत. तरीही 100 रुपयांपर्यंत दर गेलेले आहेत. देशातील जनतेची लूट केली जात आहे. तसेच महागाई त्याविरोधातही आम्हाला संदेश द्यायचा आहे' असेही पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...