आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस नेत्याचा अभिनेत्यांवर निशाणा:'अमिताभ आणि अक्षयचा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही', नाना पटोलेंचा पुनरोच्चार; मुंबईमध्ये जलसाच्या बाहेर सुरक्षा वाढवली'

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 70 रुपये प्रति लीटर पेट्रोल होते तर ट्विट करत होते, मग आता गप्प का?

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शनिवारी पुनरोच्चार केला की, ते येणाऱ्या काळात अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही. ज्यानंतर मुंबईमध्ये अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेस नेत्यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरील मौनाविषयी बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.

शनिवारी नाना पटोले यांनी म्हटले, 'आम्ही मागे हटलेलो नाही. जेव्हा त्यांचे चित्रपट रिलीज होतील किंवा आम्हाला ते दिसतील तेव्हा आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू. आम्ही लोकशाहीच्या नियमांचे पालन करु. आम्ही 'गोडसेवाले' नाही तर 'गांधीवाले' आहोत.'

आम्ही अक्षय आणि अमिताभ यांच्याविरोधात नाही
नाना पटोले हे देखील म्हणाले, 'मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात नाही तर त्यांच्या कामाविरोधात बोलायचो. ते असली हिरो नाहीत. जर ते हिरो असते तर, लोकांच्या कष्टादरम्यान त्यांच्या जवळ उभे राहिले असते. मात्र, त्यांना फक्त 'कागदी वाघ' बनून रहायचे असेल तर माझी हरकत नाही'

यापूर्वीही दोन्ही अभिनेत्यांवर साधला होता निशाणा
शेतकरी आंदोलनाविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान या अभिनेत्यांवर शेतकऱ्यांच्या मुद्द्याचे समर्थन न करण्याचा आरोप लावला होता. त्यांनी म्हटले होते की, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बिग बी आणि अक्षय कुमार गप्प का आहेत, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात या अभिनेत्यांच्या चित्रपटांची शूटिंग होऊ दिली जाणार नाही आणि त्यांचे चित्रपटही रिलीज होऊ दिले जाणार नाही.

70 रुपये प्रति लीटर पेट्रोल होते तर ट्विट, आता गप्प का?
त्यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतींवर गप्प राहत असल्याचा आरोप त्यांच्याव लावला होता. ते म्हणाले होते की, बिग बी आणि अक्षय सारखे स्टार्स पेट्रोल 70 रुपये प्रति लीटर होते तेव्हा ट्विट करत होते. आता पेट्रोलच्या किंमती जवळपास 100 रुपये प्रति लीटर आहेत. पण तरीही हे गप्प का आहेत, त्यांच्यात हुकुमशाह मोदी सरकारच्या विरोधात बोलायची हिम्मत नाही का?

बातम्या आणखी आहेत...