आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटोलेंचे सभागृहात गंभीर आरोप:माझा फोन टॅप करुन 'अमजद' नावाचा ठेवला कोड; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दानवेंचा पीए आणि खा. काकडे यांचादेखील फोन टॅप करण्यात आला

राज्यात काल 5 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने हे अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे ठेवले आहे. आज अधिवेशनचा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे. हा दिवसदेखील वादळी ठरला असून विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले की, वर्ष 2016-17 मध्ये माझ्यावर पाळत ठेवले गेली असून माझे फोन याकाळात टॅप केले होते व माझा कोड 'अमजद खान' असा ठेवला गेला असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी सभागृहात केला.

दानवेंचा पीए आणि खा. काकडे यांचादेखील फोन टॅप करण्यात आला
ते पुढे म्हणाले की, मी काळात खासदार असून त्यावेळी माझे फोन टॅप करण्याचे काहीच कारण नसल्याचे ते म्हणाले. माझ्यासोबत जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहाय्यक आणि खासदार संजय काकडे यांचादेखील फोन टॅप करण्यात आले होते. त्यामुळे सर्व गंभीर असून कोणालाही कोणत्याही व्यक्तीचा गोपनीयता भंग करण्याचा अधिकार नसल्याचे पटोले यांनी सभागृहात सांगितले.

मुस्लीम नाव का ठेवले?
दरम्यान, नाना पटोले यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करत माझे फोन टॅपिंग प्रकरणी मुस्लीम नाव का ठेवले? त्यावेजी माझेच नाव ठेवायला हवे होते. हे प्रकरण घडवून हिंदू मुस्लीमांमध्ये भांडण लावायचे उद्देश होता का? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि यामागील मुख्य सुत्रधार कोण हे सर्वाना कळायला हवे ही मागणी ही पटोले यांनी केली.

गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
सभागृहात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेतली आहे. दरम्यान, वळसे पाटील यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आदेश देण्यात येईल असे सभागृहात बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...