आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''जेव्हा मी सांगतो की मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो आणि मी कसा येतो, हे सर्वांनाच माहिती आहे.'' या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर ''ते आले पण मुख्यमंत्री नव्हे तर उपमुख्यमंत्री बनून.'' अशी खोचक टीका करीत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फडणवीसांच्या विधानाला जोरदार प्रत्युत्तर दिले.
खालचे पद मी स्वीकारले नाही
नाना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस आज काल काय बोलतात, ते त्यांनाही कळत नाही. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा आले हे खरे आहे. पण ते मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री बनून आले. माझ्यासारखी व्यक्ती असता, तर खालच्या पद मी स्वीकारलेच नसते.
काय म्हणाले होते फडणवीस?
''जेव्हा मी सांगतो की मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो आणि मी कसा येतो, हे सर्वांनाच माहिती आहे.'' असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात केले होते.
राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय
नाना पटोले म्हणाले,. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून ज्या घडामोडी घडत आहेत, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र, मित्रपक्ष म्हणून आम्ही या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेऊन आहोत.
संस्था धार्मिक व्यवस्थेपुरत्या असाव्या
काल काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातही बजरंग दलावर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भातही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही संस्था धार्मिक व्यवस्थेपूरत्या असायला हव्या, त्या धर्माच्या नावावर लुटणाऱ्या नको. शेवटी संविधानाने सर्वांना तो अधिकार दिला आहे. मात्र, मागील काही वर्षात काही लोक धर्माच्या नावाने जनतेला लुटण्याचा काम करत आहेत, अशा संघटना नसाव्यात, एवढीच आमची भूमिका आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.