आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसावले:संजय राऊतांनी चोमडेपणा करू नये, गांधी कुटुंबाविरोधात वक्तव्य सहन करणार नाही- नाना पटोले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत काँग्रेसचे प्रवक्ते नाही. त्यांनी आमच्या पक्षात चोमडेपणा करू नये, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांना खडसावले आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत. तरीही पक्षाचे निर्णय राहुल गांधीच घेतात, असे वक्तव्य संजय राऊतांनी घेतले होते. त्यावर नाना पटोले यांनी गांधी कुटुंबाविरोधात एक शब्दही सहन करणार नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

राऊत काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत

आज पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले, संजय राऊत हे काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. ते इतर दुसऱ्या कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहेत का?, हे मला माहिती नाही. संजय राऊतांनी इतर पक्षात चोमडेपणा कशाला करायचा, हे मला कळत नाही. महाविकास आघाडीतील पक्षांनी इतर पक्षांच्या अंतर्गत बाबींबद्दल बोलायचे नाही, हे ठरलेले आहे. असे असताना संजय राऊत वारंवार असे वक्तव्य करत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे.

संजय राऊतांनी संयमी रहावे

नाना पटोले म्हणाले, गांधी कुटंबाने देशासाठी मोठा त्याग केला आहे. बलिदान दिले आहे. त्यामुळे गांधी कुटुंबाबद्दल असा शब्द ऐकून घेणार नाही. अन्यथा उद्या असाही आरोप होऊ शकतो की, ठाकरे गटात उद्धव ठाकरे निर्णय घेत नाही. सर्व निर्णय संजय राऊत हेच घेतात. त्यामुळे संजय राऊत यांनी संयमी रहावे. इतर पक्षांमद्ये लुडबूड करू नये.

राऊत नेमके काय म्हणाले होते?

शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत बोलताना संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाचे महत्त्वाचे निर्णय तेच घेतली किंवा निर्णयावर त्यांचे नियंत्रण असणार नाही, असे नाही. ज्याप्रमाणे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे मल्लिकार्जुन खर्गे आहेत. मात्र, सर्व निर्णय राहुल गांधीच घेतात. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होईल. मात्र, संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा,

गौप्यस्फोट:संजय राऊतांनी ठाकरेंच्या घरात आग लावली, या शकुनीमामामुळेच बाळासाहेबांनी दिला होता राजीनामा- नीतेश राणे

बाळासाहेब ठाकरेंनी 1992 मध्ये राजीनामा का दिला होता याबाबत भाजप नेते नीतेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत, सुभाष देसाई यांनी ठाकरेंच्या घरात भावाभावात भांडणे लावली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या घरात या लोकांनी आग लावली. आणि याचमुळे बाळासाहेबांनी 1992 मध्ये राजीनाम्याचा निर्णय घेतला होता, असे नीतेश राणे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर