आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पटोलेंचा हल्लाबोल:म्हणाले- महाराष्ट्रात धार्मिक उन्माद माजवण्याचा भाजपचा डाव, त्यांना राष्ट्रपती राजवट लावायची आहे

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बुस्टर डोस सभेवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारचे हे अपयश लपवण्यासाठी भाजपला बुस्टर सभा घ्याव्या लागत आहेत. पण जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. याशिवाय टि्वट करत देखील नाना पटोले यांनी भाजपला राष्ट्रपती राजवट लावायची आहे. धार्मिक उन्माद तर निमित्त आहे, असा आरोप केला आहे.

नाना पटोले यांनी टि्वट करत महागड्या पेट्रोलियम उत्पादनांवरुन राज्य सरकारांवर खापर फोडण्याऐवजी आत्मचिंतन करावे, असा सल्ला केंद्र सरकारला दिला. राहुल गांधी नोटाबंदी, चुकीचा जीएसटी, चीन आणि बेरोजगारीच्या मुद्यांवर राहुल गांधींचे भाष्य खरे ठरले. महागाई आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेविषयीची त्यांची भीती अगदी रास्त आहे. आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी भाजप आता धर्माच्या आड लपण्याचा प्रयत्न करत आहे, असेही पटोले म्हणाले. तसेच धार्मिक उन्माद तर निमित्त आहे. राष्ट्रपती राजवट लावायची आहे, असा आरोप त्यांनी केला.

जात्यांध विचार थांबवण्याची गरज-

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे. पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे. हा जात्यांध विचार थांबवण्याची गरज आहे, असे नाना पटोले म्हणाले.

भाजप सर्व आघाड्यांवर सपशेल फेल -

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल फेल झालेले आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर मोदी सरकारकडे सांगण्यासारखे काहीही नाही. मोदी सरकारचे हे अपयश लपवण्यासाठी भाजपला बुस्टर सभा घ्याव्या लागत आहेत पण जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

भाजपने देशोधडीला लावले -

राज्यात पुरोगामी विचार रुजलेला आहे, त्याला छेद देण्याचे काम काही लोक करत आहे. हा विचार राज्याच्या प्रगतीसाठी घातक आहे. केंद्रातील भाजपा सरकारने कामगार हिताच्या कायद्यामंध्य़े मोठे बदल करुन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. मुठभर भांडवलदारांच्या दावणीला बांधून कामगारांचे हक्क व अधिकार हिरावण्याचे काम केले आहे पण कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण काम करू, असेही पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...