आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती त्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. मात्र त्यांचे पाप लपविण्यासाठी त्यांच्याकडून काँग्रेसवर आरोप करण्यात येत आहे. मी कुणावर टीका करणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी म्हटले आहे. भंडारा जि.प. निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात वाद पाहायला मिळतो आहे.
2010 पासूनची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाचून दाखवण्यात आली असती तरी ती केवळ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यामुळेच असल्याचा आरोप नाना पटोल यांनी केला आहे. ज्या लोकांचा ते उल्लेख करताय ती लोक आज भाजपमध्ये आहेत. आणि म्हणून राष्ट्रवादीकडून दाखवण्यात येणारी यादी म्हणजे आपले पाप लपविण्यासाठी केलेला एक अयशस्वी प्रयत्न आहे. असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीच्या पूर्व इतिहासात मला जायचे नाही, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका केली आहे. मला त्यांच्या वक्तिगत गोष्टीवर जायचे नाही. मात्र पवार परिवार राजकीय व्यवस्थेत कसे आहेत हे सर्वांना माहिती आहे, असे म्हणत नाना पटोलेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोनिया गांधींनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला तो आम्ही पाळला आहे. मात्र राष्ट्रवादी भाजपला वाढविण्यासाठी त्यांच्याशी साठंगाठं करीत काँग्रेसला संपवण्याचा प्रयतन करीत आहे. त्यांचा आम्ही विरोध करतो असा टोला नाना पटोंलेंनी पवारांना लगावलाय. तर राज्यात जे पाप राष्ट्रवादी लपविण्याचे प्रयत्न करते आहे. माझा इतिहास अजित पवारांनी काढला असेल, मात्र माझी समोरूनची लढाई असते, मी माघून लढत नाही, आणि पवारांचा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे मला त्यात पडायचे नाही असे म्हणत येणाऱ्या निवडणुकात योग्य निर्णय हायकंमाड करेल म्हणत त्यांनी सुचक इशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.