आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटकारे:वज्रमूठ सभेची सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती; जनता त्यांना घरी बसवेल हे त्यांना वाटते - पटोलेंची शिंदे - फडणवीसांवर टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मविआची ही तिसरी वज्रमूठ सभा आपण घेत आहोत, जेव्हा वज्रमूठ सभा जवळ येते तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होते. आपण सत्तेच्या बाहेर जाऊ, जनता आपल्याला विरोध करेल, अशी भीती सत्तेची मलई खाणाऱ्या सत्ताधाऱ्यांना वाटते, म्हणून ते सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखतात असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, काल-परवा बाजार समितीच्या निवडणुका झाल्या. यात मविआच्या बाजूने निकाल आला. कारण भाजप हा शेतकरी विरोधीपक्ष आहे. म्हणून राज्यात सत्ताधारी पक्षाचे लोक निवडणूक घेत नाहीये.

नाना पटोले म्हणाले की, धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमासाठी खारघर सभेला अमित शाह 2 तास उशिराने आले. तेव्हा अनेक जण उन्हामध्ये तडफडत होते. यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, पण गुन्हे दाखल झाले नाहीत. आप्पासाहेब धर्माधिकारींवर हे सरकार आरोप करत आहे. ज्यादिवशी निवडणुका येतील तेव्हा हे सरकार सत्तेबाहेर जाईल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

नाना पटोले म्हणाले की, विकास कोकणाचा नाही तर यांच्या बगलबच्यांचा होतो, कोकणाला संपवण्याचे काम सुरू आहे. बारसूमध्ये बाहेरच्या परप्रांतीयांच्या नावाने जमिनी घेतल्या आहेत. या सर्व गोष्टीचे सरकारला परिणाम भोगावे लागतील असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

नाना पटोले म्हणाले की, हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरु झालाय. हे सरकार मूठभर लोकांसाठी काम करत आहे. केंद आणि राज्य सरकार संविधान संपवायला निघाले आहे. विधानसभेत आम्ही प्रश्न उपस्थित केले. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायला तयार नाही. सरकारला शेतकऱ्यांची मदत करायची नाही.