आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nana Patole Critizsize On Narendra Modi | Marathi News | Congress State President Nana Patole Called The Central Government A Pickpocket! Criticism Of Rising Fuel Prices |

पाकिटमार सरकार:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केंद्र सरकारला म्हटले पाकिटमार! वाढत्या इंधन दरवाढीवरून केली खोचक टीका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा 80 पैशांनी वाढ झाली आहे. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांनी एक ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘कच्च्या तेलाच्या किंमतीत 26 टक्क्यांनी घट, तरीही आज पेट्रोलच्या दरात 80 पैशांची, तर डिझेलच्या दरात 70 पैशांची वाढ. आठवड्याभरात इंधनात 4.80 रुपयांची दरवाढ. वारे रे पाकिटमार मोदी सरकार’ असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले नेहमी वेगवेगळ्या मुद्दांवरुन मोदी सरकारवर त्रिकास्त्र करत असतात. 27 मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 31 मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती पटोले यांनी दिली. तसेच 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. त्यानंतर 2 ते 4 एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. ७ एप्रिलला राज्य मुख्यालयात मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 'गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपचा कारभार असल्याचेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...