आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nana Patole Critizsize To Shinde Fadanvis Govt | Demand Wet Drought Maharashtra | The Shinde Fadnavis Government Meant Rob The People; When Will Farmers Get Help Nana Patole

राज्यात भाजपप्रणीत सरकार:शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे जनतेला लुबाडण्याचे काम; शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार- नाना पटोले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"राज्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल हे अद्याप कोणालाही माहिती नाही, काँग्रेस कार्यसमितीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे राज्यातील जनतेला लुबाडण्याचे काम करत आहे. असा सर्व प्रकार आम्हाला या अधिवेशनात पाहायला मिळाला" अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार केली. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विधीमंडळ भवनाच्या परिसरात नाना पटोले पत्रकारांशी संवाद साधत होते.

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. हेक्टरी 75 हजार रुपये जिराईत आणि फळबागासाठी दीड लाख रुपये हेक्टरी मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी आपण केल्याचेही नाना पटोल म्हणाले.

राज्यात भाजपप्रणीत सरकार

शिंदे-फडणवीस सरकार हे अजूनही संभ्रमात असून, त्यांचा सत्तेचा स्वत:आनंद घ्यायचा असून, जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम ते करत आहे. ही मानसिकता महाराष्ट्रात भाजपप्रणीत ईडी सरकारची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा, बेरोजगारांबाबत सरकार अजूनही गंभीर नाही, त्याचे दर्शन आपल्याला राज्याचा विधानसभेत पाहायला मिळाले. मंत्री कशाप्रकारे उत्तर देतात, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कशा प्रकारे उत्तर देतात त्यांच्या उत्तरावर हे स्पष्ट होते की, त्यांच्या मौजमस्तीमध्ये महाराष्ट्रात ईडीचे भाजपप्रणीत सरकार वागत आहे.

शिक्षकांना न्याय मिळावा

टीईटीमधे 7500 हजार शिक्षक अपात्र ठरले असून, त्यांची पगार देखील बंद करण्यात आली आहे. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, "फडणवीस सरकारमध्ये 2014 पासून टीईटी नवीन व्यवस्था राज्यात निर्माण झाली. त्यांच्या बगलबच्यांना त्यात काम देण्यात आले. प्रशासनामध्येही त्यांचे काही धागेदोरे पाहायला मिळाले. सत्तार यांच्या मुलींचे देखील त्यात नाव आले होते. शिक्षणाचा दर्जा चांगला व्हावा, चांगले शिक्षक यावेत. प्रशिक्षित शिक्षक यावे, अशी कल्पना त्यामागे असू शकते. पण त्यातून जे काही घोटाळे बाहेर आले त्याच्यामध्ये जे मिरीटवाल्या शिक्षकांवर अन्याय झाल्या असेल आणि म्हणून भाजपचे सरकार ज्यावेळी सत्तेत होते. जे कोण या घोटाळ्यात होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे व जे शिक्षक खरच पात्र आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे.

तर चौकशी करावी

मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचे आता शिंदे-फडणवीस सरकार म्हणत आहे. कोरोना काळात मुंबई पालिकेचे जगभरात कौतुक करण्यात आले मात्र, आता त्यांना भ्रष्टाचार दिसत असेल तर त्यांनी चौकशी करावी, असेही पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...