आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Nana Patole Elected As State President Of Congress, Official Announcement From Congress; Yesterday He Resigned As The Speaker Of The Assembly

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काल राजीनामा आज प्रदेशाध्यक्ष:नाना पटोलेंची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा; प्रणिती शिंदेंनादेखील मोठी जबाबदारी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कालच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

नाना पटोलेंची अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसने शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष पदी आपली निवड होणार याच खात्रीने गुरुवारी पटोले यांनी आपला विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संध्याकाळीच त्यांच्या नावाची घोषणा काँग्रेसकडून होणार हे निश्चित मानले जात होते. 24 तासानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी यावर शिक्कामोर्तब केला.

काँग्रेसने जारी केलेल्या पत्रकानुसार, नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करत त्यांच्यासोबत 6 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची सुद्धा निवड केली. यामध्ये माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना देखील मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

हे राहतील महाराष्ट्र काँग्रेसचे 6 कार्यकारी अध्यक्ष

 1. शिवाजी राव मोघे
 2. बसवराज पाटील
 3. मोहम्मद आरिफ नसीम खान
 4. कुणाल रोहिदास पाटील
 5. चंद्रकांत हांडोरे
 6. प्रणिती सुशीलकुमार शिंदे

हे आहेत काँग्रेसचे नवे महाराष्ट्र उपाध्यक्ष

 1. शिरीष मधुकरराव चौधरी
 2. रमेश आनंदराव बागवे
 3. हुसेन दलवई
 4. मोहन जोशी
 5. रंजीत प्रताप कांबळे
 6. कैलाश कृष्णराव गोरंट्याल
 7. बी.आय. नगराळे
 8. शरद आहेर
 9. एम.एम. शेख
 10. माणिक मोतीराम जगताप
बातम्या आणखी आहेत...