आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतभेद:शरद पवार यांचे वैयक्तिक मत, नाना पटोलेंची जेपीसीमार्फत चौकशीची मागणी, दिला 'UPA'च्या काळातील कोळसा घोटाळ्याचा संदर्भ

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले. शरद पवार यांच्या या भूमिकेवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांचे वैयक्तिक मत असू शकते. मात्र जेपीसी घोटाळ्याची चौकशी होऊ शकते असे म्हणत पटोलेंनी कोळसा घोटाळ्याच संदर्भ दिला आहे.

अदानी घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे अदानी घोटाळ्यावरुन विरोधकांच्या एकीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विरोधकांच्या मागणीनंतर...

नाना पटोले म्हणाले, हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. पण तुम्हाला आठवत असेल की, जेव्हा कोळसा घोटाळ्याचा आरोप झाला होता, तेव्हा कोर्टाची समिती बसवण्यात आली होती. पण तेव्हा देखील विरोधकांच्या मागणीनंतर जेपीसीमार्फत चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी देखील जेपीसीमार्फत चौकशी होऊ शकते, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे.

मोदीजी का घाबरत आहेत?

नाना पटोले म्हणाले, मोदीजी अदानी प्रकरणात का घाबरत आहेत, हा प्रश्न आता देशातील जनता विचारत आहे. एलआयसी, एलआयसीचा, एसबीआयचा किंवा पीएफचा पैसा असण्याची शक्यता असल्याने जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण त्यांचा पैसा लुटला जात आहे. मोदीजी म्हणत आहे की, आम्ही चोरी केलेली नाही तर मग ते का घाबरत आहेत? असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले, जेपीसीमध्ये लोकसभा व राज्यसभेत जो सर्वात मोठा पक्ष आहे, त्याच्याच खासदारांची संख्या अधिक असते. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता जेपीसी बनवलीच तर त्यात भाजपचे 15 खासदार असतील. उर्वरित 6 ते 7 खासदार विरोधी पक्षातील असतील. ज्या जेपीसीत विरोधकांची संख्या एवढी कमी आणि सत्ताधाऱ्यांची संख्या अधिक असेल, अशा समितीच्या निर्णयावर शंका उपस्थित करायला वाव आहे.

महाविकास आघाडीतील मतभेद

हिंडेनबर्ग अहवालावरून उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीवरून महाविकास आघाडीत मतभेद निर्णाण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी यांच्या जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे म्हटल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाला आहे. आता नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी जेपीसीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आपण जेपीसी चौकशीवर ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अदानी प्रकरणावरून महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा उघड झालेत.

संबंधित वृत्त

अदानी घोटाळ्यावर भूमिका

अदानी घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले. त्यामुळे अदानी घोटाळ्यावरुन विरोधकांच्या एकीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर