आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदेंनी लुटारू व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवले:'मित्र'च्या उपाध्यपदी आशर यांच्या निवडीला काँग्रेसचा आक्षेप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुटारू व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात "महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन -मित्र (Maharashtra Institution for Transformation- MITRA)" ची स्थापना करण्यात आली आहे. याच्या अध्यक्षपदी अजय आशर आणि राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे.

भाजपलाही होते नको

'मित्र'चे उपाध्यक्षपद हे कॅबिनेट दर्जाचे आहे. यावर पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आशिष शेलार यांनी अजय आशर यांच्याबाबत भूमिका मांडली होती. नगरविकास भागामध्ये हा पैसे गोळा करणारा व्यक्ती कोण, अशी अजय आशर यांच्याबद्दल विचारणा केली होती. आक्षेप उपस्थित घेतला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांचाही आशर यांच्या नावावर आक्षेप होता.

जनतेला उत्तर द्या

पटोले पुढे म्हणाले की, अजय आशर या लुटारू व्यक्तीला राज्याचा मित्र आयोग म्हणजेच नियोजन आयोगाच्या महत्त्वपूर्ण जागी बसवलेले आहे. यामध्ये आपली सहमती आहे का? दुसरे एकीकडे कर्नाटकाला काही गावे देण्याचा घाट सुरू आहे. राज्यातून उद्योग गुजरातमध्ये पाठवले जात आहेत. आता राज्याची तिजोरी लुटायचा निर्णय आपण घेतलेला आहे का? या प्रश्नाचे उत्तर जनतेला द्यावे लागणार आहे. अशा लुटारू व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल, तर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही पटोले यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...