आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:मोदी सरकारने लोकशाहीचा खून केला, कर्नाटकात 5 वर्षात भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला. 5 वर्षात भाजप सरकारचे कामकाज पाहिल्यास कर्नाटक जनतेवर अत्याचार केले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्न कर्नाटकमध्ये या 5 वर्षात निर्माण झाल्याचा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. सध्या काँग्रेस 128 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 77 आणि जेडीएस 17 जागांवर आघाडीवर आहे. एक जागा इतरांच्या खात्यात जात असल्याचे दिसून येत आहे. नाना पटोलेंनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

कृतिम महागाई लादली

नाना पटोले म्हणाले, कर्नाटकमध्ये जनतेला काम करण्यासाठी 40 टक्के कमिशन द्यावे लागायचे. भाजप सरकारचा खरा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला आहे. ज्या लिंगायत समाजाच्या जीवावर भाजप याठिकाणी निवडून आले त्याच लिंगायत समाजाला आज वाळीत टाकले आहे. कर्नाटकात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. कृतिम महागाई लादली. भाजपच्या कामकाजावर जनता नाराज होती. आणि याचाच परिणाम निकालात दिसून येत आहे.

लोकशाही सांभाळणारा पक्ष

नाना पटोले म्हणाले, ईडीचा, सत्तेचा दुरुपयोग करुन जनता घाबरणार नाही. कर्नाटकमध्ये जागरुक सरकार हवे आहे. या देशात लोकशाही सांभाळणारा, संविधान सांभाळणारा कोणता पक्ष असेल तर तो काँग्रेस आहे. भाजपने मल्लिकार्जुन खर्गेंना मारण्याची धमकी दिली होती. आज याचठिकाणी 124 च्या वर जागा काँग्रेसला मिळत आहे. सुशिक्षित, शेतकरी, गरिबांचा कौल काँग्रेसच्या बाजूने आलेला आहे.

गांधींकडे लढण्याचा वारसा

नाना पटोले पुढे म्हणाले, भाजपने राजीव गांधींची चुकीची प्रतिमा निर्माण केली. राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मिर पायीय चालले. त्यांनी लोकांची गळाभेट घेत त्यांची दुःखे जाणून घेतली. मोदींनी देवाच्या नावाने राजकारण केले. हीच मोदींची स्टाईल आहे. मोदींनी त्यांना किती शिव्या घातल्या याची यादी वाचली. मात्र गांधी घराण्याला तुम्ही किती शिव्या दिल्या, त्याचे काय? राहुल गांधी सुशिक्षित आहेत. त्यांच्याकडे देशासाठी लढण्याचा वारसा आहे.

संबंधित वृत्त

कर्नाटक विधानसभेचा निकाल:आयोगाच्या कलांमध्ये काँग्रेस 95 जागांवर पुढे, 43.7% मते, भाजपला 64 जागांवर आघाडी

सावधगिरी:घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवणार? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितले