आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडी बिघाडीच्या दिशेने:उद्धव ठाकरेंना सांगितले होते असे करु नका, हा काँग्रेसला कमजोर पाडण्याचा प्रयत्न; नाना पटोले संतापले

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरेंना सांगितले होते असे करु नका. मात्र तरीही त्यांनी काँग्रेसच्या स्नेहल जगतापांचा पक्षप्रवेश केलाच. महाविकास आघाडीतील एका पक्षाला कमजोर पाडण्याचा प्रयत्न होत असेल तरी ती जागा लढणार तर आम्हीच, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ठाकरे गटाला दिला आहे. महाविकास आघाडीत काहीही आलबेल नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

महाड विधानसभेच्या जागेवरुन ठाकरे गट आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. काँग्रेसच्या पदाधिकारी स्नेहल जगताप यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला. या प्रवेशावरुन नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली आहे. स्नेहल जगताप यांना ठाकरे गटात प्रवेश देऊ नका, असे पटोलेंनी ठाकरेंना कळवले होते. मात्र तरीही ठाकरेंनी स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिलाच.

नाना पटोले म्हणाले, उद्धव ठाकरेंना सांगितले होते असे करु नका. मात्र तरीही त्यांनी केलेले आहे. महाविकास आघाडीतील एका पक्षाला कमजोर करण्याचे काम होत असेल तर हे चुकीचे आहे. महाविकास आघाडीची चर्चा होईल त्यात आम्ही याबाबत बोलूच. मात्र ती जागा काँग्रेस पक्षाची आहे आणि आम्ही ती लढूच, असा निर्धार पटोलेंनी व्यक्त केला.

नेमका वाद कुठून सुरु झाला?

महाडमध्ये 6 मे रोजी उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत काँग्रेसच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप यांचा ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी स्नेहल जगताप यांना शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्याविरोधात उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्या आहेत. त्यामुळे नाना पटोले नाराज झाले आहेत.

वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी

पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत, अशा प्रकारची टीका आजच्या सामनातून शरद पवारांवर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीही आता पेटून उठली आहे. छगन भुजबळांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे?

संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे वाटते का, असा खडा सवाल सोमवारी छगन भुजबळ यांनी केला आहे. राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या बॅगांवर लक्ष ठेवले असते, तर आजची परिस्थिती वेगळी असती, असा सणसणीत टोलाही त्यांनी राऊतांना लगावला. एकूणच महाविकास आघाडीत बिघाडी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

संबंधित वृत्त

चर्चा तर होणारच:वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले, राष्ट्रवादीत लोक बॅगा भरून तयारच होते; ठाकरे गटाचा थेट आरोप

पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला, अशाप्रकारची थेट टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादी आणि पवारांवर करण्यात आली आहे. वाचा सविस्तर