आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''शरद पवारांनी कोणत्या कारणाने पदाचा राजीनामा दिला हे सांगणे शक्य नाही. अजित पवारांबाबत माध्यमांत जे काही येत होते ते की, त्यांच्या परिवारात काय असेल किंवा शरद पवारांची प्रकृतीचा विषय असो, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्यानंतरच सांगणे योग्य ठरेल, असे मत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. माध्यमांनी आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.
पवारांनी निर्णय बदलण्याची मागणी
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांनी आज जाहीर कार्यक्रमात राजीनामा देत असल्याचे (निवृत्ती घेत असल्याचे) स्पष्ट केले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षातून या निर्णयाला विरोध होत असून शरद पवारांनी राजीनामा देऊ नये अशी भुमिका पक्षाच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत आहे. याच धर्तीवर महाविकास आघाडीचे घटक काॅंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले नाना पटोले?
शरद पवारांनी कोणत्या कारणाने पदाचा राजीनामा दिला हे सांगणे शक्य नाही. अजित पवारांबाबत माध्यमांत जे काही येत होते, त्यांच्या परिवारात काय असेल किंवा शरद पवारांची प्रकृतीचा विषय असो.. त्यावर आता बोलण्यात अर्थ नाही. त्यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा करू. किंवा त्यांनी सांगितल्यावरच वक्तव्य केलेले योग्य राहील.
नाना पटोले म्हणाले, आम्हाला वाटत होते की, शरद पवार शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक आणि राजकीय जीवनात राहतील. पण, त्यांनी का राजीनामा दिला? हे समजण्यापलीकडे आहे. नेहमी विचारधारा घेवून लढतील असे वाटत होते; पण त्यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला काहीही फरक पडणार नाही. राष्ट्रवादीत जेही अध्यक्ष होतील त्यांच्यासोबतही आमचे चांगले संबंध राहतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.