आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर, अमरावतीत भाजपला नाराजीचा फटका बसला आहे. भाजपने दुसऱ्यांची घरे फोडल्याने त्यांचा हा पराभव होणारच होता, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली. पटोले म्हणाले की, अपक्ष आमदार सत्यजित तांबेंबाबत आता हायकमांड निर्णय घेतील. तांबे कुटुुंबीयांसोबत आमचे काही वैर नाही. भाजपकडून सर्व गोष्टी ठरवून केल्या आहेत, आम्हाला केवळ सुधीर तांबेंनी फॉर्म भरताना घेतलेल्या भूमिकेला विरोध आहे. काँग्रेसचे केवळ भाजपविरोधात मोट बांधणे हे ध्येय आहे. नागपूर व अमरावती येथे भाजपचे विद्यमान आमदार होते, तरी ते पडले. आज अमरावती, नागपूर अशा दोन्ही विभागांमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी आम्हाला मदत केलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.