आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे आदेश आज सर्वोच्च न्यायालायाने दिले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशातही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस दोष देत असतात. त्यांचा हा खोटारडेपणा आता उघड झाला आहे. भाजपच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
सुप्रीम कोर्टाने 2 आठवड्यात स्थनिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करा, असे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय यंदाच्या निवडणुका होणार आहेत. हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवा धरले आहे. राज्य सरकासरच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
भाजप आणि आरएसएस हे आरक्षणविरोधी - पटोले
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आरक्षणविरोधी आहेत. मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षण दिले होते, त्यावेळी भाजपने कंमडल यात्रा काढली होती. केंद्रातील भाजप सराकारने इम्पिरीकल डाटा न दिल्यामुळेच ओबीसीच्या राजकीय आरक्षणांचा प्रश्न निर्माण झाला होता. केंद्र सरकारला अनेकदा डाटा मागूणही त्यांनी तो न दिल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले आहे. यासाठी पूर्णपणे मोदी सरकार जवाबदार आहे. असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
भाजपला मते हवीत ओबीसी नेतृत्व नको ?
भाजपची विचारसरणी ही आरक्षणाच्या विरोधातील आहे. त्यामुळे 5 वर्षांत सत्तेत असताना आरक्षण वाचविण्यासाठी काही केले नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.ओबीसीची केवळ मते घ्यायची त्यांचे राजकीय नेतृत्व तयार होऊ द्यायचे नाही. ही भाजपची खरी भूमिका आहे. त्यांना आरक्षण किंवा शासकीय योजनांचा लाभ घेऊ द्यायचा नाही. पाच वर्ष सत्तेत असताना आरक्षण वाचविण्यासाठी काहीही केले नाही. भाजपला खरेच ओबीसी आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने तात्काळ कार्यवाही करून ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत बहाल करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.