आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविकास आघाडी:2014 मध्ये काँग्रेसला धोका मिळाला होता, आता आम्ही सतर्क, हाच आमचा प्लॅन B; नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्याव्यतिरिक्त आमचा प्लॅन बी म्हणजे आम्ही सगळ्या ठिकाणी सतर्क आहोत, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नाना चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वेळोवेळी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकांची चांगलीच चर्चा होताना दिसते. महाविकास आघाडीत काँग्रेस एकीकडे तर राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची सेना एकीकडे असे चित्र पाहावयास मिळते. याआधी पटोलेंनी महाविकास आघाडी न झाल्यास काँग्रेसचा प्लॅन बी तयार असल्याचे वक्तव्य केले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी त्या प्लॅन बी आणि मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले म्हणाले, आतापर्यंतची जी परंपरा राहिली आहे ती म्हणजे ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. ही आतापर्यंतची आपल्या लोकशाहीची परंपरा आहे. प्लॅन ‘बी’विषयी बोलायचे झाल्यास, ज्या पद्धतीने 2014 मध्ये काँग्रेस पक्षाला धोका मिळाला, त्यामुळे आता आम्ही सतर्क आहोत. महाविकास आघाडीत ज्या गोष्टी त्या-त्या वेळेस ठरतील, ज्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा असेल, मुख्यमंत्री कोणाचा बनेल यासंबंधीचा निर्णय असेल तेव्हा काँग्रेस सतर्क असेल, असे पटोले म्हणाले आहेत.

चर्चा अथवा बैठक झालेली नाही-पवार

नाना पटोले म्हणाले, आज काँग्रेस पक्ष म्हणून काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी ही भूमिका आहे की प्रत्येक ठिकाणी काँग्रेस उभा राहिला पाहिजे. काँग्रेसचे अस्तित्व दिसले पाहिजे. मात्र नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीची याबाबत अशी काही चर्चा अथवा बैठक झालेली नाही. ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे.