आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआघाडीत बिघाडी असल्याच्या वावड्या उठत असतानाच आता पुन्हा नाना पटोलेंच्या एका भुमिकेमुळे राजकीय धुराळा उडाला आहे. नाना पटोलेंनी राष्ट्रवादी आणि भाजप एका वाटेवर असल्याचे अधोरेखित करीत भाजपसारखीच राष्ट्रवादी शेतकरीविरोधी होईल असे सनसनाटी वक्तव्य केले. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खरपूस समाचार घेत नाना पटोलेंना मविआत अंतर पडण्याचा इशारा दिला व मविआच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी शेतकरीविरोधी होईल - पटोले
नाना पटोले म्हणाले की, आम्ही एका विचाराने भाजपविरोधात लढत आहोत. भाजपसोबत लढत असल्यास राष्ट्रवादी काॅंग्रेसही शेतकरीविरोधी होतील.
अनेक वक्तव्य दखलपात्र
महाविकास आघाडीत कोणताही ताळमेळ नाही असे विरोधक आरोप करतात. परंतु या आरोपांना नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच बळ मिळताना दिसते. कारण अनेक वेळा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्य हे महाविकास आघाडीच्या भवितव्याला पोषक अशी नाहीत.
अजित पवारांनी सुनावले!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मोजक्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत नाना पटोलेंना इशारा दिला. महाविकास आघाडी जर टिकवायची असेल तर बैठकीत बोलले पाहिजे, मीडिया समोर बोलण्याची गरज नाही.
..तर अंतर पडू शकते
अजित पवार म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वारंवार मविआत काय तरी अलबेल असल्यासारखं बोलत असतात. त्यांच्या अशा बोललण्याने आघाडीमध्ये अंतर पडू शकते. यामुळे या गोष्टी बंद केल्या पाहिजे. ज्यावेळेस आमची महाविकास आघाडीची बैठक होईल त्यावेळेस मी याबाबत बैठकीत बोलणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.