आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून विधिमंडळ अधिवेशनात जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळी नाना पटोले यांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले असून, त्यांना विधानसभेत बसण्याची जागा द्यावी, अशी विनंती अध्यक्षांना केली. तेव्हा त्यांना राहुल नार्वेकरांनी चिमटा काढलाच, तर देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही कुठे दिसतच नाही, असा टोला हाणला.
कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मते घेत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. हा निकाल येताच विधानसभेत नाना पटोले यांनी आनंद व्यक्त केला. त्यावरून खडाजंगी रंगली.
नाना पटोलो विधानसभेत म्हणाले, अध्यक्ष महाराज आत्ताच कसबा निवडणुकीचा निकाल आला. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर अकरा हजारांच्या मतांच्या फरकांनी निवडून आलेत. आणि अध्यक्ष महाराज त्यांच्या बसायची जागाही आपल्याला करावी लागेल.
पटोलेंच्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, नाना पटोले या सदनाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. ते स्वतः सुमारे ११ महिने विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. मला त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की, निवडणूक आयोग प्रमाणपत्र देईल. त्यानंतर आम्हाला कळवेल. त्यानंतर आपण केलेल्या विनंती नुसार त्यांना योग्य जागा देण्यात येईल. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही टोलेबाजी केली.
देवेंद्र फडणीस म्हणाले, मी नाना भाऊंचे अभिनंदन करतो. जो निकाल आहे, तो स्वीकारला पाहिजे. चिंचवडचा ही निकाल येणार आहे, तो ही स्वीकारावाच लागेल. कसब्याचे काही आत्मचिंतन आम्ही करू, तसे तुम्हालाही तुम्हालाही आत्मचिंतन करावे लागेल. तीन राज्यांच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस कुठे दिसतच नाही. आता तुमच्यावर ही स्थिती आली नाना भाऊ की, एखादा विजय मिळाला तर तुम्हाला सभागृहात उभे राहून सांगावे लागते. थोडे आत्मचिंतन तुम्ही करा. थोडे आत्मचिंतन आम्ही करू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.