आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकेचे 'बाण':भगवे कपडे घालणारे सर्वच साधू नसतात; रावणाने भगवे वस्त्र घालून सीतेचे अपहरण केले होते - पटोलेंचा CM शिंदेंना टोला

ठाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवे कपडे घालणारे सगळे साधूच असतात असे नाही. रावणाने भगवे कपडे घालूनच सीतेचे अपहरण केले होते असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

राज्यात अवकाळीचा कहर सुरू असून शेतकरी हवालदील झाले आहेत. या धर्तीवर शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने कठोर पाऊले उचलायला हवी पण सरकारचे मंत्री आमदार अयोध्या दौऱ्यात गर्क आहे अशी टीका विरोधकांकडून होत आहे. रावणाची उपमा आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिल्यानंतर हाच धागा पकडत नाना पटोले यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

यांना हिंदुंचे ठेकेदारपद दिले नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अयोध्येचा दौरा केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरयू तीरावर आरतीही केली. यावरुन आता टीका केली जात आहे. नाना पटोले यांनी टीका करताना म्हटले की, यांना (भाजप - शिंदे गट) हिंदूंचे ठेकेदारपद यांना कुणी दिलेले नाही. हिंदूंचे ठेकेदार म्हणून यांना कुणी प्रमाणपत्र दिलेलं नाही.

भगव्या कपड्यावरुन टीकास्त्र

नाना पटोले म्हणाले, भगव्या कपडे घातले म्हणून कुणी हिंदू होत नाही. स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार म्हणणे हे सोंग घेण्याचाच प्रकार आहे. रावणानेही भगवे कपडे घालून सीतेचे अपहरण केले होते. त्यामुळे भगवे कपडे घालून सगळे साधू संत होतात असे नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही टीका केलेली असताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भगव्या रंगावरून भाजपावर आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. सचिन सावंत यांनी एक ट्वीट करत भाजपा आणि एकनाथ शिंदेंना एक प्रश्न विचारला आहे.

सचिन सावंत यांची टीका

काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीकात्मक ट्विट केले. त्यात त्यांनी म्हटले की, ''भगवी बिकीनी चालत नाही पण भगवा कार्पेट चालतो. बिनधास्तपणे पादत्राणे घालून भगवा कार्पेट तुडवा. जनतेच्या धार्मिक भावनांशी खेळून सत्तेचा सारीपाट भाजपा कसा मांडते यांचे हे उदाहरण. दांभिकपणा हा भाजपाचा स्थायीभाव आहे. धार्मिक द्वेष पसरवण्यातून यांचे राजकारण होते पण देश कमजोर होत आहे. ''